सातशीव हनुमान मंदीर भागातील रुद्राणी कंपनीच्या कैम्पवर अज्ञात चोरट्याचा धुमाकूळ -NNL

सुरक्षा गार्डला केली मारहाण; जबरीने मोबाईल, नगदी रक्कम व १६ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला 


हिमायतनगर,अनिल मादसवार|
तालुक्यातील पारवा खु.भागात असलेल्या सातशीव हनुमान मंदीरजवळील रुद्राणी कंपनीच्या कैम्पवर दि.२५ च्या पहाटे ३ च्या सुमारास अज्ञात चोरटयांनी येथे येऊन दगडफेक केली, एव्हडेच नाहीतर कुऱ्हाडीने दरवाजा तोडून आत शिरून सुरक्षक गार्ड व त्यांच्या सहकाऱ्याला मारहाण केली. आणि त्यांच्या जवळील नगदी रक्कम व १६ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस डायरीत अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबरी चोरीच्या प्रकारामुळे सत्साहींव हनुमान मंदिर व तालुका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हिमायतनगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. मागील काही दिवसापूर्वी पळसपूर येथे चोरी करून चोरटयांनी जागी झालेल्या एका नागरिकावर दगडफेक करून जखमी केले होते. या घटनेचा तपस लागण्या अगोदर पुन्हा अशीच एक घटना हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात येणाऱ्या मौजे परवा खुर्द परिसरात घडली आहे. काल दिनांक २५ जून रोजी पहाटे ०३.२२ वाजेच्या सुमारास, सातशीव हनुमान मंदीर समोर ता. हिमायतनगर जि.नांदेड येथील मौजे पारवा खुर्द शिवारातील रुद्रानी इनफ्रास्टक्चर कॅम्प येथे नेहमीप्रमाणे कर्तव्यवार सेक्युरीटी गार्ड नागोराव पवार होते. 

यावेळी येथे काही चोरटे आले असल्याचे समजल्यानंतर त्यांनी येथील इतरांना फोन करुन चोर आलेत हुशार रहा असे कळविले. त्याच्या पाच ते दहा मिनीटांनी फिर्यादीचे रुम बाहेर अज्ञात चार माणसे येवून त्यांनी अचानक दगडफेक सुरु केली. ते आत येवु नये म्हणुन फिर्यादी व त्यांचे सोबती असलेल्या  दोघांनी दरवाजा पक्का धरुन ठेवला. परंतु आरोपीतांनी त्यांच्या दरवाजावर लाथा व कुर्‍हाडीने मारुन आत घुसले व पैसे दया नाहीतर मारुन टाकु अशी धमकी दिली.

त्यापैकी एकाने फिर्यादीच्या डोक्यात जेवणाचे स्टिलचा टिफीनचा डब्बा मारुन जखमी केले. हॅगरवर असलेल्या पॅटच्या खिशातुन नगदी 2000/- रुपये व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमती 5000/- रुपयेचा व सोबतचे चिंटु भाई यांचे पाकीटातुन नगदी 1500/- रुपये आणि ओपो रेनोव्हो कंपनीचा मोबाईल किंमती 8000/- रुपयाचा असा एकुण किंमती 16,500/-रुपयाचा माल जबरीने चोरुन नेला. एव्हडेच नाहीतर अज्ञात चोरट्यानी इरटिगा गाडीचे काच फोडुन नुकसान केले. पावसाळा सुरु होताच चोरटयांनी आपला मोर्चा पुन्हा हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात वळविला असल्याने नागरिकात बीटी निर्माण झाली आहे. अश्या घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी पोलिसांनी रात्रगस्त वाढून नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. 

घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस पथकाने पोचून पंचनामा केला. तसेच या घटनेबाबत सुरक्षा गार्ड दगडु बन्सी ओहळ, वय ४० वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी रा. रुद्रानी इनफ्रास्टक्चर कॅम्प सातशीव हनुमान मंदीर समोर ता. हिमायतनगर जि.नांदेड यांनी दिल्यावरुन हिमायतनगर पोलीस डायरीत गुरनं १५६/२०२२ कलम ३९२,४२७ भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भुसनर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.श्री महाजन व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी