भोकर तालुक्यात विजांचा कडकडाट; पाळज येथे विज पडुन तिन शेतकरी ठार -NNL


भोकर।
नांदेड जिल्ह्यातील भोकर  तालुक्यातील पाळज शिवारात पेरणीचे कामात व्यस्त आसलेल्या वेळी आभाळात गडगडाट होऊन वीज कोसळल्याने तीन शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि 21,जुन रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडल्याने यात त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

भोकर तालुक्यातील मौजे पाळज येथील शेतकरी (1) राजेश्वर मुत्येन्ना चटलावार वय 45 (2) भोजेन्ना पोशट्टी रामणवाड वय 36 (3 )साईनाथ किशन सातमवार वय 32 आपल्या गट क्रमांक (6) मध्ये पेरणीचे काम करत असतांनां आचानक आलेल्या वादळीवारा व विजेच्या कडकडाटाह आलेल्या पावसात आपला बचाव करण्यासाठी झाडाखाली गेले होते.

दरम्यान याच वेळी विजांचा कडकडाट होऊन झाडावर विज पडल्याने त्या तिघाही शेतकऱ्यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहीती कळताच उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार राजेश लांडगे, राजकुमार मस्के (तलाठी पाळज), पंजाबराव मोरे (तलाठी किनी),सचिन आरू (मंडळाधिकारी मोघाळी) यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी