हिमायतनगर तालुक्यात अवैध्य पिस्तूललसह दोघांना अटक; ग्रामीण भागात गुन्हेगारी पसरतेय -NNL


नांदेड/हिमायतनगर|
नांदेड शहरात मागील महिन्याभरात अनेकांकडून अवैध पिस्तुल जप्त करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली. त्या अनुषंगाने आता ग्रामीण भागातही कार्यवाहीचा धडाका सुरु झाला आहे. ग्रामीण भागातही अवैध पिस्तुलांचा वापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हिमायतनगर पोलिसांनी अवैध पिस्तूलसह दोघांना अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, गुन्हेगारीचे जाळे ग्रामीण भागात आले असल्याचे यावरून दिसते आहे.

नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिलेल्या सूचनेनंतर हिमायतनगर शहर व परिसरात पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त सुरु आहे. दरम्यान गस्तीच्या कामात असलेले एपीआय नंदलाल चौधरी यांच्या पथकाने सरसम येथे जाऊन अत्यंत गोपनीय पद्धतीने निखिल देशमुख आणि विकास ताडेवाड यां दोघांना ताब्यात घेतले. अगोदर निखील देशमुख याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आढळून आले. चौकशीता हे पिस्टल अवैद्य असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी अन्य साहित्य जप्त करून या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवार दि. २२ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हिमायतनगर तालुक्‍यातील सरसम येथे करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्‍यातील मौजे सरसम येथील संशयित निखिल संदीप देशमुख (वय २४) आणि विकास दत्ता ताडेवाड ( वय २०) हे दोघेजण विनापरवाना स्वतःजवळ पिस्तुल बाळगुन परिसरात दहशत माजवीत असल्याची गुप्त माहिती हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुसनुर यांना मिळाली होती. यावरून त्यांनी आपले सहकारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी याना सूचना केली.

यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल यांनी, पोलीस हवालदार कोमल कागणे, पवन चौदंते, जिंकलवाड आणि कुलकर्णी यांना सोबत घेऊन कार्यवाही केली यात  हत्यारासह दोघांना अटक केली आहे. याबाबत नंदलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरून निखिल देशमुख आणि विकास ताडेवाड यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार कोमल कागणे ह्या करत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी