शिक्षणातून सुसंस्कृत समाज निर्मितीची गरज-डॉ.काब्दे -NNL

नांदेड एज्युकेशन सोसायटीचा 72 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा


नांदेड|
शिक्षणाकडे केवळ नौकरी, रोजगार या दृष्टीकोणातून बघणे धोकादायक आहे. त्यामुळे शिक्षणातून सुसंस्कृत समाज निर्माण करण्याची गरज आहे, असे मत नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी व्यक्त केले.

नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे कार्यालय स्वामी रामानंद तिर्थ संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे, संस्थेचे उपाध्यक्ष सी.ए.डॉ.प्रविण पाटील, सचिव प्रा.श्यामल पत्की, पीपल्स हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष नौनिहालसिंघ जहागीरदार, कार्यकारिणी सदस्य धनंजय डोईफोडे, कार्यकारिणी सदस्य चिरंजीवीलाल दागडीया, सायन्स कॉलेज शालेय समितीचे अध्यक्ष ऍड.प्रदीप नागापूरकर आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना डॉ.काब्दे म्हणाले की, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्वातंत्रता सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाड्यासारख्या मागास भागात सुसंस्कृत व मूल्याधिष्ठीत समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यातुन पीपल्स महाविद्यालय, सायन्स कॉलेज, पीपल्स हायस्कूल सारख्या संस्थांमार्फत गेल्या 72 वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य सुरु आहे. आज शिक्षणाकडे केवळ नौकरी, व्यवसाय, रोजगाराच्या दृष्टीकोणातून बघितले जात आहे. हे समाजासाठी घातक असल्याचे सांगून सुसंस्कृत व मुल्याधिष्ठीत समाज निर्मितीसाठी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, पीपल्स हायस्कूलचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी लोकांना सी.ए.प्रविण पाटील यांनी दिवंगत स्वामी रामानंद तीर्थ यांनी समाजातील सर्वच घटकांना आपापल्या भागात शिक्षण घेता यावे यासाठी नांदेड एज्युकेशन सोसायटी सारखी संस्था उभी केली. त्यांच्या पश्चात दिवंगत गोविंदभाई श्रॉफ, सदाशिवराव पाटील यांच्या सारख्या लोकांनी संस्थेच्या कार्याला भरारी दिली. डॉ. काब्दे यांच्या नेतृत्वात संस्थेच्या विविध संकुलात शिक्षणासोबतच मूल्यधिष्ठीत समाज निर्मितीचे कार्य सुरु असल्याचे सांगितले. आगामी काळात नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज व पीपल्स हायस्कूल हे तीन्ही शिक्षण संकुल शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त केला. 

प्रा.सौ.श्यामल पत्की यांनी संस्थेच्या भरारीत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे मोठे योगदान असून प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी नवनवीन संकल्पना घेवून कार्य करीत आहेत. त्याचा फायदा या संस्थेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना नक्की होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऍड.प्रदीप नागापूरकर यांनी केले. यावेळी संस्थेत उत्कृष्ट कार्य करणार्‍या कर्मचारी मुकेश, खालीद, राहुल गवारे यांचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डी.यू.गवई, प्राचार्य आर.एम.जाधव, मुख्याध्यापक सुर्यकांत कुंभार सर, उपप्राचार्य प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे, प्रा.ई.एम.खिल्लारे, प्रा.अशोक सिध्देवाड, प्रा.डॉ.किरण शिल्लेवार, प्रा.गोरे यांच्यासह संस्थेचे सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी