जमिनीतून सोने काढल्याचे बनवाबनवी करून , शेतकऱ्यांला नकली सोन देवून फसवणूक केल्या प्रकरणी खळबळ -NNL

उस्माननगर पोलिस ठाण्यात तक्रार, चिखली येथील घटना


उस्माननगर,  माणिक भिसे।
कंधार तालुक्यातील मौजे चिखली येथील एका शेतकऱ्याच्या घरी अनोळख्या व भामट्याने मला सोन जमिनीतून मिळल्याचे बनवाबनवी करून ,व सदरील शेतकऱ्यांला विश्वासात घेऊन सोन्याचे नकली बिस्कीट देवून ९९ हाजाराला फसवल्याचे लक्षात आल्या नंतर  सदरील भोदूसोनाराच्या विरुध्द उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून , ऐन पेरणीच्या धामधूमीत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कंधार तालुक्यातील मौजे चिखली येथील एका शेतकऱ्याशी ओळख निर्माण करुन मला जमिनीतुन भरपूर प्रमाणात सोने मिळाले आहे. पण ते सराफा दुकानांत एकदाच विकता येत नाही. त्यामुळे  तुम्हाला बाजार दरापेक्षा कमी किमतीत सोने म्हणून. " पाच तोळ्याचे नकली बिस्कीट देवून फसवणूक केल्याचे प्रकार  नुकताच घडल्याने परिसरातील नागरिक व शेतकऱ्यां घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.चिखली ता. कंधार येथील प्रेमा गणपतराव पवळे वय(५० )वर्ष यांची पूर्णा तालुक्यातील चांगफळ (हा.मु.क्रांतीचौक पुर्णा ) येथील करण उर्फ हाणुमंत शिवाजी कांबळे  वय ४० याने गावातील शेतकऱ्यांशी ओळख निर्माण केली.


या ओळखीत त्यांने मी धनपायाळू आहे. मला जमिनीतील धन सोन दिसल अन् सोन माझ्याकडे आहे.पण मला ते सोने सराफा दुकानांत एकदाच विकता येत नाही.त्यामुळे मी ओळखीच्या माणसाला बाजार भाव पेक्षा कमी किमतीत सोने देत आहे. तुम्हालाही त्याच दरामध्ये म्हणजे आजचा दर पन्नास हजार रुपये आहे.तर तुम्हाला प्रति तोळा पंचवीस हजार रुपये प्रमाणे सोने देतो ,असे विश्र्वासात घेऊन पटवून दिले.प्रेमा पवळे हे कांबळे यांच्या बोलण्यात आले . आणि त्यांनी पाच तोळ्याचे सोन्याचे  नकली बिस्कीट घेतले , आणि त्या बदल्यात फोन पै च्या वेगवेगळ्या नंबरवर प्रेमा पवळे यांनी ९९ हाजार रुपये करण कांबळे यास दिले.पण खरे सोने म्हणून नकली बिस्कीट सोने आपल्याला देण्यात आल्याचे पवळे यांना काही दिवसातच लक्षात आले .

 त्यांनंतर प्रेमा पवळे हे करण कांबळे यांच्या घरी खुप वेळा खेटे मारले ,पण तो व्यक्ती भेटण्यास टाळाटाळ करीत आहे  , मोबाईल बंद करीत असल्याचे लक्षात घेऊन आपली फसवणूक झाल्याचे दिसून आले प्रेमा पवळे यांनी उस्माननगर पोलिस ठाण्यात सविस्तर घटनेची माहिती सांगून तक्रार केली.त्यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या भोंदू सोनार करण उर्फ हाणुमंत कांबळे यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते हे करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी