शिक्षणाधिकारी श्रीमती. बिरगे मॅडम यांची सावरगाव येथील प्राथमिक शाळेला धावती भेट -NNL


नांदेड|
दिनांक 23 जून 2022 रोजी नांदेड जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती. सविता बिरगे मॅडम यांचा किनवट दौरा नियोजित होता. किनवट येथे जात असताना काही वेळासाठी मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा सावरगाव येथे आल्या. शाळेचे सुंदर असे प्रांगण पाहून त्यांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. 

नंतर वर्गात जाऊन वर्गातील रंगीबेरंगी चित्रे, डिजिटल स्मार्टबोर्ड पाहून व वर्गातील व्यवस्थित मांडलेले शैक्षणिक साहित्य पाहून समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांशी हितगुज करून व नवीन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची माहिती घेऊन शिक्षकांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी  कु.वेदिका संतोष फर्रास हिने बिरगे मॅडमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच त्यांच्या सोबत आलेले डाॅ. सिरसाठ सर नांदेड यांचे स्वागत शिक्षण विस्तार अधिकारी श्री कराड सर यांनी केले.    

श्रीमती. बिरगे मॅडम यांच्या हस्ते शाळेच्या आवारात दोन झाडं लावण्यात आली. तसेच मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती. वर्षा ठाकूर-घुगे मॅडम यांच्या वटसावित्रिच्या उपक्रमातील लावलेल्या वडाच्या झाडाची आवर्जून पाहणी केली. तसेच शाळेतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता संकुल यांचीही पाहणी केली. व शाळेला पुन्हा भेट देणार असल्याचे सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. किशोर कावळे सर, सहशिक्षक श्री. रामराव अनंतवार सर, शालेय पोषण आहार कर्मचारी बाबुराव देशमुखे व सौ.यशोदा देशमुखे गावकरी श्री. नंदकिशोर मेंढे व श्री. ज्ञानेश्वर टारपे हे उपस्थित होते.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी