चाकूर पोलीसांची गुटखा विक्रेत्यांवर छापे,१० लाख ७० हजार मुद्देमालासह आरोपीच्या मुसक्या आवळल्या -NNL


लातूर/चाकूर।
 शहरातील गुटखा,पान मसाला विक्रेत्यांवर पोलीसांनी छापे टाकून धडक कारवाई केली असून या कारवाईत १० लाख ७० हजार मुद्देमालासह आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

यामध्ये चाकूर शहरात सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम व पोलीस प्रभारी अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर शहरात गुटखा बहाद्दरांवर मोठी कार्यवाही करुन येथून गुटखा, पान मसाला,कार व ॲटो असा ४ लाख ९२ हजार ८२० रुपयांसह हाळी हंडरगुळी येथून गुटखा,पान मसाला असा ५ लाख ७७ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम व पोलीस प्रभारी अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या पथकाने सोसायटी चौकातील गंगाधर दशरथ सोमवंशी,राजेश्वर दशरथ सोमवंशी यांचे घरी व दुकानात दुपारी २ ते ३.३० दरम्यान छापे मारून त्यांच्या घरुन विविध कंपनीच्या गुटखा व पान मसाला ५८५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहमद इस्माईल लालूभाई शेख व गफुर इस्माईल लालूभाई शेख यांच्या घरी ४ ते ५ दरम्यान छापा मारून गुटखा व पान मसाला १२३१७० रु एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच रमन प्रल्हाद माने,तिरुमल प्रल्हाद माने यांच्या घरी दुपारी छापे मारुन २९०० रु मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबरोबरच वरील लोकांकडून मिळालेल्या माहितीवरुन हाळी  हंडारागुळी येथे पाच जणांच्या घरी छापे मारले असता ओमकार मल्लिकार्जुन काळवणे यांच्याकडून एकूण ३०३६० रु.माल ,रोशन बाजीराव तांबोळी यांच्याकडे ३ लाख ७१ हजार २५ रु मुद्देमाल,सीनिल तातेराव माचेवार यांच्याकडील ३४८०० रु विष्णू जनार्धन हमदळे यांच्याकडून ७५६०० रु मुद्देमाल,रामदास निवृत्ती चिंतलवार यांच्याकडून ६५४०० रु गुटखा,पान मसाला असा एकूण ५८००७५ रु गुटखा व पान मसाला एक कार व ॲटो किंमत ४९२८२० असा एकूण १०६९९९५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चाकूर पोलिसांनी गुटका विक्रेत्यांवर मोठी कारवाई करीत लाखो रुपये किंमतीचा गुटका जप्त केला असुन दोन वाहने जप्त करून अकरा गुटका विक्रेत्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.येथील आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम व अभयसिंह देशमुख यांनी गुटखा बहाद्दरांवर मोठी कारवाई करून दहा लाख एकोनसत्तर हजार नऊशे पंच्यानव्व रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.यात अकरा गुटका विक्रेत्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.या गुटका विक्रेत्यांवर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी