तामसा येथील भाडे सोडून गावाकडे परत येणारी क्रुझर टिनशेडवर धडकली; एकाचा जागीच मृत्यू -NNL

हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव फाट्याजवळ घडली दुर्घटना  


हिमायतनगर|
तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील एक गाडी व्यावसायिक तामसा येथील भाडे सोडून गावाकडे परत येत असताना एम एच २६ बी क्यू ७९९६ हि रोडवरून थेट खैरगाव शिवारातील टिनशेडवर धडकली. हि घटना दि.०७ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली असून, या दुर्घटनेत चालक बालंबाल बचावला असून, एकाचा मृत्यू झाला असून, मयत नारायण फकीर राव कल्याणकर वय 24 असे नाव आहे. 


याबाबत सविस्तर व्रत असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील क्रुझर गाडी नेहमीप्रमाणे भाडे घेऊन गेली होती. सदरील भाडे संबंधित गावाच्या ठिकाणी सोडून चालकासह अन्य एकजण आपल्या मूळ गावी परत येत होते. दरम्यान खैरगाव शिवारात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट शेतातील टिन शेडवरील झोडपड्यावर धडकली. या घटनेत झोपड्याच्या पत्रावरील दगड थेट गाडीत घुसून वाहनातील नारायण कल्याणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालकाला किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. हि घटना सोमवार दि.०७ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे.


घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचा पंचनामा सुरु केला आहे. या दुर्दवी घटनेमुळे सरसम बु.गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत गाडीचा चुराडा झाला असून, मोठे नुकसानही झाले आहे. काल याचा गावातील एक युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्यानंतर आज अपघातात एकाचा बळी गेल्याने सरसम गाव दुःखाच्या सावटाखाली आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive