खासदार चिखलीकर यांच्या प्रयत्नातून आणखी सहा रुग्णांना १३ लाख रुपयांची मदत -NNL


नांदेड।
नांदेड लोकसभा मतदारसंघातील गोरगरीब आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून पुन्हा रुग्णांसाठी 13 लाख 60 हजार रुपयांचा निधी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे . लवकरच या सहा रुग्णांच्या उपचारासाठी हा निधी संबंधित रुग्णालय प्रशासनाकडे वर्ग केला जाणार आहे.

 नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यापासून अगदी पहिल्या आठवड्यापासून जनहितासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत शेकडो रुग्णांना जीवदान मिळण्यासाठी लाखो रुपयांचा पंतप्रधान सहाय्यता निधी मंजूर करून देण्यात आला आहे . 

नायगाव तालुक्यातील  रातोळी येथील श्रीराम माधव पांचाळ यांच्या उपचारासाठी एक लाख रुपये,  परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील सिद्धार्थनगर येथील श्रीमती आम्रपाली संभाजी कापुरे यांना तीन लाख रुपयांची मदत , मुखेड तालुक्यातील जाहुर येथील श्रीमती शोभा प्रकाश दासरवाड यांना एक लाख 45 हजार रुपयांची मदत,  बिलोली तालुक्यातील डोणगाव येथील गंगाराम लक्ष्मण कसल्लू यांना 2 लाख 15 हजार रुपयांची मदत ,, नांदेड तालुक्यातील आलेगाव येथील प्रेमानंद दत्ता गिरी यांना तीन लाखाची तर नांदेड शहरातील बजरंग कॉलनी येथील पद्मावती किशनराव कंगनवार यांना 3 लाख रुपयांची अशी एकूण 13 लाख ६० हजार रुपयांची पंतप्रधान सहाय्यता निधी मंजूर करण्यात आली आहे .

यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वतः पाठपुरावा करत आपल्या मतदारसंघातील आणि परिसरातील नागरिकांना जीवदान मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने पंतप्रधान सहाय्यता निधीतून खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी मिळवून दिले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी