जि.प.के.प्रा.शाळेत पहिले पाऊल कार्यक्रम उत्साहात साजरा -NNL


उस्माननगर,माणिक भिसे।
संस्कार - गुणवत्ता ,प्रगती  या त्रिसूत्रीच्या  माध्यमातून उस्माननगर ता.कंधार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक ( मुलांची व मुलींच्या) शाळेने( नवीन ) नुतन विद्यार्थी पहिले पाऊल कार्यक्रम गावातून प्रभातफेरी काढून उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास  उपशिक्षणाधिकारी येडपुरवार ,सौ ‌ज्योत्स्ना धुतमल ( डायटच्या अधिव्याख्यात्या)  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण काळम , केंद्रप्रमुख मुख्याध्यापक जयवंतराव काळे,श्रीमती वांगेबाई , आमिनशा फकीर, यांच्या प्रमुख उपस्थितीती होती.  प्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पहिलीतील प्रवेशीत विद्यार्थ्यीनी विद्यार्थीचे गुलाब पुष्प व पुष्पहार घालून स्वगत करण्यात आले .

 इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणारे चिमुकले विद्यार्थी, नवीन शैक्षणिक वर्षातील शाळेमध्ये घेण्यात येणारे विविध प्रकारचे उपक्रम माहिती देणारे दालन, सेल्फी पाॅईंट, याकडे कुतूहल नजरेने पाहत असल्याचे चित्र शाळेच्या पहिल्या दिवशी दिसून आले. इयत्ता पहिली ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करुन विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रबोधन करण्यात आले.

 मागील दोन वर्षांतील कोविड १९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते.या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये  शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी राज्यात १५ जून पासून शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले होते.यानुसार उस्माननगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात शिक्षण विभाग यशस्वी झाला असे चित्र दिसून आले. 

सकाळी दहा वाजता गावातील प्रमुख मार्गावरून शिक्षक व विद्यार्थ्यांनी " आपली मुले शाळेत पाठवा. " म्हणत प्रवेशोत्सव फेरी वाजत गाजत काढली. यात नवीन प्रवेश पात्र चिमुरड्यांचा लक्षवेधी सहभाग होता. 

नवीन शैक्षणिक वर्षातील शाळांना अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले. नवीन पुस्तके मिळाले म्हणून आगळावेगळा आनंद बालकांच्या चेहऱ्यावरदिसून आला. गावातून प्रमुख रस्त्याने शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून गावातून   लोकांपर्यंत पोहोचवून शाळेसाठी विद्यार्थी पाठवावे असा संदेश देण्यात आला

यावेळी डायट अधिव्याख्याता जोस्ना धूतमल, केंद्रीय मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख जयवंत काळे, एकनाथ केंद्रे, खान, सौ.सुनंदा पाटोदेकर ,सौ.सुशिला आलेवाड,सौ.आशा डांगे,महमंद खान, रामेश्वर पांडागळे, गौतम सोनकांबळे, अनिरूद्ध सिरसाळकर,सौ.मंजुषा देशमुख, सौ.प्रेमला गाजूलवाड सौ.मिनाक्षी लोलगे, प्रल्हाद सुर्यवंशी, यांच्या सह गावातील नागरिक,ग्रा.प.सदस्य , शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येनेआदींची उपस्थिती होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी