समता ज्यु.काॅलेजची यशाची परंपरा कायम -NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर यांच्या वतीने  फेब्रुवारी- मार्च मध्ये घेण्यात आलेल्या  इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये उस्माननगर ता.कंधार येथील समता ज्यु.काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी यांनी घवघवीत यशाची परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश संपादन केले.

समता ज्यु.काॅलेज मध्ये सर्व प्रथम  वारकड दीक्षा माधवराव हिला ८६ .१७ टक्के गुण मिळविले ,शिंदे सुमती नरेश हिला ८५. ३३ टक्के गुण , पाटील सोमनाथ राजेश्वर यास ८१ .६७ टक्के गुण मिळविले.घोरबांड कोमल आनंदराव हिला ८१. टक्के गुण मिळविले आहे.काळम नरेश जगदेवराव यास ७७.५० टक्के गुण मिळाले आहेत.भरकडे शुभांगी नागोराव हीला ७७.७६ टक्के गुण मिळविले आहे. साखरे श्रेया हनुमंत ७६.८३ टक्के गुण मिळविले.कळसकर ओमकार मनोज ७०.३३ टक्के गुण मिळाले, तिडके ज्ञानेश्वरी सटवाजी यास ६९. टक्के गुण मिळाले.संस्कृत विषयांत मुलीनी बाजी मारली आहे.

समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान,कला, वाणिज्य या शाखेचा निकाल उत्कृष्ट लागला आहे.कोरोना महामारी नंतर प्रथमच झालेल्या परिक्षेतील नैत्रदिपक मिळविलेल्या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कमलाकरराव देशपांडे, तुकाराम वारकड गुरूजी , श्यामसुंदर जहागिरदार गुरुजी,बां.दे.कुलकर्णी,  अनिरूद्ध सिरसाळकर,प्रदीप देशमुख, मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड, पर्यवेक्षक राजीव अंबेकर,प्रा.उमाकांत तुंबरफळे, प्रा.कटकमवार,प्रा. पोफळे,प्रा.प्रकाश काळम,यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक,प्राध्यापक वृंद कर्मचाऱ्यांसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी