सततच्या पावसाने मौजे वटफळी येथील जि.प.प्राथमिक शाळेची वर्गखोली व बाथरूम कोसळली -NNL

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही..


हदगाव/हि.नगर, गजानन जिदेवार।
आज दिनांक 26 जुलै 2022 रोजी मौजे वटफळी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मोडकळीस आलेली जुनी वर्गखोली व बाथरूम सततच्या पावसामुळे कोसळली. यामध्ये खोलींची भिंत व छतावरील पत्रे खाली पडलेले अवस्थेत दिसली व शेजारील बाथरूम पुणे पूर्ण मोडकळीस झालेली आहे .सदर घटना ही शालेय वेळेत झाली नाही त्यामध्ये कसलीही हानी व दुखापत झाली नाही सदर राहिलेल्या वर्गखोलीचा भाग धोकादायक अवस्थेत आहे. 


मुख्याध्यापक यांनी त्या ठिकाणी भिंत कोसळली आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्यास मनाई केली आहे . पूर्वी पासून ही भिंत धोकादायक असल्याने मुलांना त्या वर्गात बसविण्यात आले नव्हते त्यामुळे जीवित हानी झाली नाही. शाळेचे नूतनीकरण करण्यात यावे त्यासाठी शासनाने त्वरित या ठिकाणी असलेली धोकादायक इमारत हटवावी.


 सदरील घटना गावाचे सरपंच, उपसरपंच ,तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य सर्व पालक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी