जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाह-डॉ.व्यंकटेश काब्दे -NNL


नांदेड, अनिल मादसवार।
जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असी गर्जना माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केली. आरक्षण हक्क संवर्धन समिती सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण पूर्ववत बहाल केल्याबद्दल सावित्रीबाई जोतिबा फुले चौकात पेढे वाटप करण्यात आले.

आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने गेली वर्षभर विविध आंदोलन अंदोलन केले.ओबीसी जनजागरण अभियानाला यश आले. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात  मार्गदर्शन करताना डॉ.काब्दे म्हणाले, ओबीसी आरक्षण न्यायालयाने दिले तरी संपुर्ण ओबीसी समाजाला पुर्ण न्याय मिळाला नाही.

संपुर्ण जातनिहाय जनगणना होऊन,आरक्षण मिळणार नाही,तोपर्यंत  महाराष्ट्रात ओबीसी जनजागरण अभियान राबवून,लढा सुरूच ठेऊ असा निर्धार त्यांनी या वेळेस केला. ओबीसी लढ्यात सक्रिय लढा लढलेल्या शिलेदारांचा पुष्पहार करून,पेढे भरून सत्कार करण्यात आला. २६ जून२०२१ पासून आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी डॉ.व्यंकटेश काब्दे (माजी खासदार नांदेड ) यांच्या अध्यक्षतेखाली व श्याम निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली,हा लढा सुरू करण्यात आला.

मा.सर्वोच्च न्यायालयाने पूर्ववत ओबीसी आरक्षण बहाल केल्यानंतर या लढ्यातील सक्रिय शिलेदारांचा आनंदाने पेढा भरून पुष्पहाराने डॉ.व्यंकटेश काब्दे साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्याम निलंगेकर, सोपानराव मारकवाड, उपप्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे,दत्तात्रय अण्णमवाड, यशवंत थोरात,सुरेश राठोड, संजय वाघमारे,मरीबा कांबळे,रोहन कहाळेकर, गोपीनाथ राठोड,तडखेले सर,बालाजी नारे यांच्यासह ओबीसी चळवळीतले इतर अनेकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गुरुवार,२८ जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान संपुर्ण  प्रवर्गासह सर्व जाती, जमातींची जात निहाय जनगणना झाली पाहिजे,यासाठी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आरक्षण हक्क संवर्धन समितीचे राज्य संघटक श्याम निलंगेकर यांनी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी