सीमावर्ती यांच्या प्रश्नावर केवळ आराखडा आखला, गंजगाव ते कारला रस्ता चिखलाने माखला -NNL

गावकऱ्यांच्या आणि शाळेच्या एकजुटीने पुन्हा रस्ता सुरू केल्याचा हा घ्या दाखला..


बिलोली, गोविंद मुंडकर।
तालुक्यातील गजगाव येथील रस्त्याचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित राहिले. थातूरमातूर काम करून मोठे श्रेय घेण्याचे प्रयत्न काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाने केले. गावाचा संपर्क तुटला,रस्ता चिखलाने माखला, तरीही कोणत्याही अधिकारी आणि पदाधिकारी यांनी पुढाकार नाही घेतला. अशी प्रतिक्रियांनी व्यक्त केली.

बिलोली तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील गंजगाव हे गाव अनेक दृष्टीने प्रसिद्ध आहे. येथील रेती साठी अधिकारी, पदाधिकारी हे वारंवार चकरा मारतात. मोठ्या प्रमाणात रेती उत्खननामुळे येथील रस्त्यांची वाट लागली. त्यावेळेस सर्वांनीच मूग गिळून गप्प बसले. ज्याने थोडा बहुत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांना साम-दाम दंड भेद याचा वापर करून गप्प बसविण्यात आले. सुगी करण्यासाठी उपस्थित राहावे अशी मोठी गर्दी गंजगाव आणि परिसरातील रस्त्यावर दिसून येत होती. आता एकही पिल्लू दिसत नसल्याची प्रतिक्रिया येथील एका नागरिकांनी सदर प्रतिनिधी कडे व्यक्त केली. 


गावातील नागरिक ग्रामपंचायत शाळा यांच्या पुढाकाराने श्रमदानातून आणि सर्वांच्या सहकार्यातून चिखलाने माखलेला रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी ही सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले. तेलंगाना का जाऊ नये ? "प्रश्न सीमा वरती भागाचे "ही चळवळ उभी राहिली तेव्हा मोठमोठे आराखडे तयार करण्यात आले. या भागात आम्हीच काम करू शकू अशी बतावणी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाने केली. राजकारण्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून अनेकांनी आपली वाटचाल केली. 


सीमावर्ती यांचे प्रश्न पुन्हा जैसे थे राहिल्याचे येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले. असले तरी पुन्हा नव्या जोमाने प्रश्न सीमावर्ती यांचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनी आढावा घ्यावा आणि पदाधिकारी आणि अधिकारी यांना या भागांतील प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. अशी अपेक्षा गंजगावचे सरपंच प्रतिनिधी तथा सीमावर्ती भागाचे समन्वयक श्री हणमंत कांनशेट्टे यांनी व्यक्त केली.  दरम्यान महिला सरपंच सुनीता कानशेट्टे आणि उपसरपंच रेखा बाबळगावे व ग्रामपंचायत सदस्य तसेच विद्यार्थी- पालकांच्यावतीने अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या मदती शिवाय रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी