आषाढी एकादशी निमित्त विमल इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी केलं दिंडीकाढुन संस्कृतीचे दर्शन -NNL


भोकर, गंगाधर पडवळे।
आषाढी एकादशी जस जशी जवळ येते तसतसे आमहाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस  आसंख्यभक्त, लाखो वारकरी यांना लागून असते तर लाखो वारकरी पायी दिंडीत महिनाभर जाऊन आपल्या पदरी पुण्य पडून घेण्याचं काम करत असतात.


यातून त्याग,सेवा,भाव,भक्ती,याचे दर्शन घडते त्याच बरोबर संस्कृती चे जतन,धार्मिकता दृढ करण्यासाठी मदत होते त्याच धर्तीवर भोकर येथील विमल इंग्लिश स्कुल ही देश,धर्म, संस्कृती यांचे जतन करण्याचे काम सतत करत असते त्यातून विद्यार्थ्यांना देशाप्रती प्रेम,देशभक्ती, सेवाभाव, आत्मसमर्पण,तर आशा प्रकारे रॅली मधून धार्मिक, सांस्कृतिक मूल्य रुजविण्यासाठी येथील सर्व स्टाफ सदा अग्रेसर असतो.


आजच्या या वारकरी दिंडीतून महाराष्ट्राचा सांस्कृतिक  वारसा जपण्याचा प्रयत्न याठिकाणी करण्यात आला तर सदरील दिंडी ही विमल इंग्लिश स्कुल येथून निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर  चौक मार्गे भोकर च्या मुख्य रस्त्यावरून  फिरली असून विशेष म्हणजे आज सकाळ पासूनच जोरदार पाऊस पडत होता तरीही चिमुकले विद्यार्थी यात  मोठ्या उत्साहाने व मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसून आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी