शेतकऱ्यांनो चिंता करू नका... मी सदैव आपल्या सोबत; नुकसानीची मदत मिळणार - आ.माधवराव पाटील जवळगावकर -NNL

महसूल पथकांसह आ.जवळगावकरांनी पैनगंगा नदीकाठावरील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी 


हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ- मराठवाडयाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील हजारो शेतकऱ्यांची पिके अतिवृष्टीच्या पुरामुळे नष्ट झाली. अनेकांनी तर दुबार पेरणी केली त्यां शेतकऱ्यासह कैनॉल फुटून, तलाव ओव्हरफ्लो होऊन आणि नदी-नाल्याच्या काठावरील शेती पिकासह खरडून गेल्याने, शेतीत सतत पाणी साचल्याने पिके उन्मळून गेली आहेत. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मुंबईला जाऊन भेट घेऊन तात्काळ सर्वेचे आदेश द्यावे. आणि सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. त्यामुळे पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. पंचनामे करताना अधिकाऱ्यांनी कोणताही भेदभाव न करता सर्वाना न्याय द्यावा अश्या सूचना जवळगावकर यांनी दिल्या. तसेच शेतकऱ्यांना धीर देत... चिंता करू नका मी सदैव आपल्या सोबत आहे...एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी माझी आहे. लवकरात लवकरच शासकीय मदतही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळेल असा शब्द हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटिल जवळगावकर यांनी देऊन शेतकऱ्यांना एक प्रकारे आधार दिला आहे.  


ते दि.१५ जुलै रोजी हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठावरील विविध गावांना भेटी दिल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार श्री अवधाने, नायब तहसीलदार अनिल तामसकर, तालुका कृषी अधिकारी शेन्नेवाड, पोलीस उपनिरीक्षक बालाजी महाजन, विस्तार अधिकारी साईनाथ चिंतावार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, खरेदी विक्री संघाचे संचालक परमेश्वर गोपतवाड, कृउबाचे सभापती डॉ. प्रकाश वानखेडे, माजी संचालक रफिक सेठ, शहराध्यक्ष संजय माने, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.  


हिमायतनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौऱ्याला आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी कामारी जिल्हा परिषद मतदार संघातून सुरुवात केली. कामारी, वाघी - टेम्भुर्णी भागात भेट देऊन कैनॉल फुटल्याने शेती पिकाचे कसे नुकसान झाले याची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे नुकसानित आलेल्या पैनगंगा नदी काठावरील कामारी, पळसपुर, डोल्हारी, सिरपली, कौठा, कोठा तांडा या गावांना भेटी देऊन नुकसान झालेल्या शेती पिकांसह घरांची पडझड, आणि नदीच्या पुराणे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथील तलाव ओव्हरफ्लोव झाल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे समजल्यानंतर तलावाची पाहणी केली. 


हिमायतनगर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले. पावसाळा सुरुवात झाली तेंव्हापासून मी तालुक्याच्या परिस्थितीवर  लक्ष ठेऊन आहे. अति पाऊस झाल्यामुळे नदी- नाल्यासह इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांची पिके सुद्धा पूर्णतः नुकसानीत आली आहेत. आता शेतकऱ्याच्या हातात पिके येतील याची शाश्वती नाही याची मला जानिव आहे. त्यामुळे मी अगोदरच मंत्र्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. मात्र शेतकऱ्यांना धीर देणे गरजेचे असल्यामुळे आज मी तुम्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलो असल्याचे सांगून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असल्याचे मान्य केले.


एवढेच नाहीतर अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली त्यानंतर आता दुहेरी फटका बसला आहे. हे नुकसान कधीही भरून निघणे शक्य नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचे लवकरात लवकर सर्वेक्षण करून नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवावा. तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करतांना एकही शेतकरी व अतिवृष्टीमूळ अडचणीत आलेले पीडित मजुरदार, नागरिक वंचित राहणार नाही याची पूर्णतः दक्षता घ्यावी. अश्या सूचना  आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिल्या. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी