सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2022 दि 14 ते 16 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये रंगणार -NNL

सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव निमित्त नांदेड दिग्गजांची मांदियाळी

 


नांदेड।
नांदेडकरांना विविध प्रकारची संगीत  नृत्यांची सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून दरवर्षीप्रमाणे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दिनांक 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान कैशंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ- सान्वी (भरत) जेठवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली-

 

शहरात 14 ते 16 ऑगस्ट रोजी होत असलेले सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव देश-विदेशातील नामवंत कलाकार सहभागी होणार असून स्पर्धेत भाग घेणे बरोबर भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील शास्त्रीय नृत्य लोकनृत्य  विविध संगीत शैलीचे सादरीकरण हे कलाकार या मंचावर करणार असल्याने नांदेड करांसाठी ही मोठी पर्वणीच ठरणार आहेही संधी निर्माण करून दिली ती सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा नांदेडमध्ये उमटवणारी सप्तरंग सेवाभावी संस्थालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स] संस्कृती मंत्रालय भारत सरकारनांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने-

 

सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाची विभागणी दोन भागात करण्यात आली असून त्यात सकाळी 10 ते सायंकाळी 5-30 वाजेपर्यंत स्पर्धा घेतल्या जाणार आहेत तर दुसऱ्या भागात सायंकाळी 5-30 ते पुढे महोत्सवाचे आयोजन होणार आहेविशेष म्हणजे 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता विशेष लावणी बिन बायकांचा तमाशामुंबई आणि शाहीर रामानंद उगळेजालना यांचं विशेष सादरीकरणाचे आयोजन देखील यात करण्यात आले आहे-

 

14 ऑगस्ट रोजी या महोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री श्री  vk डीपीसावंतविधान परिषद सदस्य vk श्री अमरनाथ राजुरकरमहापौर सौ जयश्री पावडेविधानसभा सदस्य vk श्री मोहनराव हंबर्डेजिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकरमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सौ वर्षाताई घुगेआयुक्त मनपा डॉ सुनील लहानेvIपर जिल्हाधिकारी श्री कुशाल सिंह परदेशी यांच्या उपस्थितीने या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे-

या भव्य महोत्सवाचे समारोपीय अध्यक्ष स्थान नवनिर्वाचित खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वीकारला आहेतर प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्री हेमंत पाटील ] विधान परिषद सदस्य vk श्री बालाजी कल्याणकरविधानसभा सदस्य vk श्री श्यामसुंदर शिंदे पाटील ] विधानसभा सदस्य vk श्री राजेश पवारविधानसभा सदस्य vk श्री भीमराव केरामविधानसभा सदस्य vk श्री डॉ तुषार राठोडकुलगुरू स्वा रा ती  विद्यापीठ डॉ उद्धव भोसलेश्रीगणेश महाजन यांची उपस्थिती लाभणार आहे-

 

महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने नृत्य क्षेत्रात भरीव कामगिरी करून नावलौकिक मिळवणारे सौ रत्नम जनार्धन नायर नागपूर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यासोबतच डॉ सानवी जेठवाणी यांचे लिंग परिवर्तन करणारे  भारतामध्ये लिंग परिवर्तन क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेले डॉक्टर नरेंद्र कौशिक दिल्ली यांना आरोग्यसेवा पुरस्कार तर सिंधी भाषा प्रचलित करण्याकरिता आपल्या संस्थेच्या माध्यमातून विविध सेवा देणारे नागपूर येथील श्री प्रताप मोटवानी यांना सिंधू भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेनांदेड मध्ये कोरोना काळामध्ये  विविध समाजसेवेत अग्रेसर असणारे हॅपी क्लब नांदेड यांना युवा समाजसेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे

 

तीन दिवसीय राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वेगवेगळ्या नृत्य कलाप्रकार सादर होणार आहेत  भारतातून 6 प्रांतातील जवळपास 450 स्पर्धक  आंतरराष्ट्रीय पातळीचे गुरु यात आपला सहभाग नोंदविणार आहेत त्याचबरोबर विशेष प्रस्तुती म्हणून लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नांदेडच्या विद्यार्थ्यांचे नृत्य अविष्कार दररोज सायंकाळी 5-30 वाजता होणार आहे-

 

सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे हे lgkos वर्ष असून नांदेडकरांसाठी देश विदेशातील नामवंत  प्रसिद्ध कलाकार यांना पाहण्याची संधी मिळत असून या महोत्सवाला नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव अक्षय कदमकार्यकारणी सदस्य शुभम बिरकुरेनईम खानजितेंद्र नरवालगणेश चांडोळकर यांनी केले आहे-

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी