36 व्या नॅशनल गेमसाठी सृष्टी पाटील जोगदंडची निवड -NNL


नांदेड।
मराठवाड्यातील ऐकमेव पहीली खेळाडू भारताचे ऑलिम्पिक असलेल्या 36 व्या नॅशनल गेम साठी धनुर्विद्यांमध्ये नांदेडची सुवर्णकन्या कुमारी सृष्टी बालाजी पाटील जोगदंड ची भारतीय ऑलिम्पिक संघ व गुजरात ऑलंपिक असोशिएशनच्या वतीने आयोजित 36 व्या नॅशनल गेम साठी धनुर्विद्येतील रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्र संघात निवड झाली असून मराठवाड्यातील एकमेव असलेली तसेच नांदेडच्या इतिहासामध्ये नॅशनल गेम साठी निवड होणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे . 

भारतीय ऑलंपिक संघ व गुजरात ऑलंपीक संघटनेच्या वतीने दिनांक 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 दरम्यान प्रथमच गुजरात मध्ये 36 व्या नॅशनल गेमचे आयोजन करण्यात आले असून यामधील 36 खेळातील सात हजार खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत कामगिरी करणार आहेत .सदरील स्पर्धेसाठी देशातील केवळ टॉप आठ राज्य सहभागी होणार आहेत त्यात महाराष्ट्राचा समावेश असून नुकतेच महाराष्ट्र संघाची धनुर्विद्या निवड चाचणी 9 ऑगस्ट 2022 रोजी अमरावती येथे घेण्यात आली .

त्यात नांदेडच्या कुमारी सृष्टी जोगदंडने उच्चतम कामगिरी करत या स्पर्धेसाठी आपली जागा कायम केली . त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे . तिच्या यशाबद्दल तिचे ऑलम्पिक प्रशिक्षक रविशंकर भारतीय धनुर्वीधा संघटनेचे महासचिव तथा छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद चांदुरकर महाराष्ट्र आर्चरी संघटनेचे अध्यक्ष अँड. प्रशांत देशपांडे, आंतरराष्ट्रीय पंच ब्रिजेश कुमार. शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे , आमदार डॉ. तुषार राठोड, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा ऑलम्पीक संघटना अध्यक्ष रमेश पारे , उपाध्यक्ष जनार्दन गुपीले, मनपा उपायुक्त रमेश चवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, संघटना अध्यक्ष खासदार हेमंत पाटील , सचिव वृषाली पाटील जोगदंड, अवतार सिंग रामगडीया, डॉ. रमेश नांदेडकर, डॉ. राहुल वाघमारे,

 डॉ. अविनाश बारगजे, नेहरू युवा समन्वयक चंदा रावळकर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिग परीहार, महाराष्ट्र धनुर्विद्या सहसचिव सोनल बुंदेले, प्रविण गडदे, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे कोषाध्यक्ष रंगराव साळूंके, प्रा जयपाल रेड्डी, बाबू गंदपवाड, प्राचार्य मनोहर सुर्यवंशी, संघटना कार्याध्यक्ष डॉ हंसराज वैद्य.अनिल थडकर, प्रणव भांडूरे, हरिदास रणदिवे, मास्टर विजय कांबळे,शिवकांता देशमुख, बालाजी चेरले,संघटना सहसचिव नारायन गिरगावकर, अनिल बंदेल, संजय चव्हाण, संतोष कनकावार, मालोजी कांबळे, शिवाजी केंद्रे, प्रेम जाधव, सुशिल दिक्षीत, शेख शफी, परिक्षीत भांगे, शिवाजी शिंदे, साईनाथ झुझरवार, सचिन आवटे आदीनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी