हिमायतनगर/लाईनतांडा येथील शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

महिन्याभरात तिसऱ्या शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाणीला कंटाळून केली आत्महत्या

हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे हिमायतनगर तालुक्यातील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी राजा हतबल झाला असून, नापिकी व कर्जबाजारीमुळे दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. आज दि.०५ रोजी आणखी एका शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपविल्याची घटना तालुक्यातील लाईनतांडा येथे उघडकीस आली आहे. अंकुश कैलास राठोड वय २८ वर्ष असे मयत युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिमायतनगर तालुक्यातील किनवट - हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या बजावला लाईन तांडा आहे. येथील युवा शेतकरी अंकुश कैलास राठोड वय २८ वर्ष हा आपल्या कुटुंबासह आई - वडिलांच्या नावाने असलेली शेती कसून उदरनिर्वाह करत होता.  मात्र गेल्या तीन वर्षांपासून सतत अतिवृष्टी आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे नापिकी होते आहे. यंदा तर पावसाने कहर केला असून, अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने सोयाबीन व कापूस असलेली शेती खरडून गेली. तर उर्वरित पीक चिबदून गेल्याने गेल्या काही दिवसापासून शेतकरी चिंताग्रस्त बनला होता.

मागील वर्षी आई वडिलांच्या नावाने भारतीय स्टेट बैन्केतून जवळपास ३ लाखाचे पीककर्ज घेतले. यंदा पिके चान्गली होतील आणि कर्ज फेडून गुण्या गोविंदाने जीवन जगू या आशेत शेतकरी होता. मात्र अतिवृष्टीने होत्याचे नवहते केल्याने काल दि ०४ ऑगस्ट रोजी रात्रीला बाहेर जाऊन येतो म्हणून गेला तो घरी आला नाही. त्यामुळे सकाळी सर्वत्र शोधाशोध केली असता मयत अंकुश कैलास राठोड वय २८  वर्ष लाईन तांडा यांचा मृतदेह मधुकर सीताराम राठोड यांच्या विहिरीत आढळून आला. 

या घटनेने युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची खबर नामदेव किशन राठोड यांनी दिल्यानंतर हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात सध्यातरी युवा शेतकऱ्याचा विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, घरचा करता व्यक्ती गेल्याने कुटुंब निराधार झाले असून, शेतकऱ्याच्या मृत्यू पाश्च्यात वृद्ध आई वडील, पत्नी, १ मुलगा १ मुलगी, भाऊ भवजयी असा मोठा परिवार आहे. सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात मयत युवा शेतकऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी