"ये देश है वीर जावानो का.." या देशभक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न -NNL


हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार|
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत हिमायतनगर येथील संघर्ष सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने आज "ये देश है वीर जावानो का.." या देशभक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. 


या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस निरीक्षक बी डी. भुसनर यांनी केले. यावेळी प्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महत्तम गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून नारळ फोडण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष आशिष सकवान, पोलीस पाटील शंकर वानखेडे पळसपूरकर, भाजप युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, बिट जमादार अशोक सिंगणवाड, पत्रकार सय्यद मनानं भाई, अनिल मादसवार, अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विविध देशभक्तीपर गीते सादर करून येथील कलाकारांनी वीज जवानांना मानवंदना दिली. या कार्यक्रमच सुरेसख असा सूत्रसंचालन डॉ अब्दुल गफार यांनी केलं.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी