उमरा येथील पत्रकार वसंत सिरसाट यांना यंदाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर -NNL


उस्माननगर, माणिक भिसे। 
उमरा - मारतळा सर्कलचे प्रतिष्ठा न्यूज चे प्रतिनिधी  पत्रकार वसंत सिरसाट यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा सन 2022 साठीच्या पुरस्कार साठी त्यांची निवड झाली आहे.  

पत्रकार वसंत सिरसाट यांनी तळागळातील ,सोषिशाताचे प्रश्र्न  निर्भिडपणे मांडून न्याय दिला आहे.सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अभ्यासू पत्रकार म्हणून सुपरिचित आहे.त्यांच्या लिखनाची दखल घेऊन हा उत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
सांगली येथील जिंदाबाद मीडिया हाऊस प्रतिष्ठा न्यूज यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा पत्रकारिता क्षेत्रातील सन 2022 मधील उत्कृष्ट कार्याबद्दलचा पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच वसंत सिरसाट उमरेकर  यांना प्राप्त झाले आहे. प्रतिष्ठा न्यूजचा तिसरा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरूप हे शाल ,श्रीफळ व सन्मान चिन्ह आणि प्रमाण पत्र हे असणार आहे 
       
 हा पुरस्कार सोहळा दि. 7 ऑगस्ट 2022 रोज रविवारी सकाळी 11 वाजता सांगली येथे मा.अजितराव घोरपडे (सरकार) (माजी पाटबंधारे मंत्री महाराष्ट्र राज्य.) माननीय खासदार संजय काका पाटील (सांगली लोकसभा) प्रा.डॉ. बाबुराव गुरव (ज्येष्ठ विचारवंत/ अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलन) मा. पृथ्वीराज (बाबा) पाटील (अध्यक्ष- सांगली जिल्हा शहर काँग्रेस कमिटी) मा. जालिंदर महाडिक ( विशेष अधिक्षक पाटबंधारे विभाग पुणे) मा. प्रा पि आर.वाघमोडे ( ज्येष्ठ साहित्यिक जत) मा.तानाजीराव जाधव (संपादक प्रतिष्ठा न्यूज सांगली ) व मा.सौ. विद्याताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा सांगली येथील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन येथ संपन्न होणार आहे  .                       
               
उमरा येथील पत्रकार  वसंत सिरसाट यांना  पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल ताटे पाटील, संजय देशमुख, प्रदीप देशमुख, देविदास डांगे, सुर्यकांत मालीपाटील, माणिक भिसे , संभाजी कांबळे, गणेश लोखंडे,लक्ष्मण कांबळे, लक्ष्मण भिसे, संभाजी काळम पाटील,चुडामण काळम, राजीव अंबेकर,यांच्यासह सर्वच क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी