नांदेड जिल्हा पोलीस विभागातर्फे महिला सुरक्षा जनजागृतीसाठी शक्ती रॅली -NNL


नांदेड।
 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज नांदेड जिल्हा  पोलीस विभागातर्फे महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृतीच्या उद्देशाने शक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले. अडचणीच्यावेळी तात्काळ मदत व्हावी यासाठी मुली व महिलांच्या सुरक्षितेच्यादृष्टिने पोलीस विभागातर्फे शक्ती मोबाईलची निर्मिती करण्यात आली आहे.

 नांदेड येथे शैक्षणिक केंद्र लक्षात घेता खासगी शिकविणी, महाविद्यालय, शाळा व इतर गर्दीच्या ठिकाणी शक्ती मोबाईल पथक तात्काळ मदतीसाठी तत्पर असेल, असे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सांगितले. त्यांच्या व पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या संकल्पनेतून मोबाईल शक्ती पथक याची निर्मिती करण्यात आली आहे.


या पथकाबाबत व महिला सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती साठी खास शक्ती रॅलीचे आज आयोजन आले होते. महापौर जयश्रीताई पावडे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नांदेड मनपाचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

शक्ती रॅलीचे प्रतिनिधित्व पोलीस उपनिरीक्षक प्रियंका अघाव, गंगुताई नरतावार, रंजना शेळके, क्रांती बंदखडके, शुभांगी जाधव, रेखा चक्रधर, पडगीलवाड, पद्मीन जाधव, सुशिला जानगेवार, सुनिता मलचापुरे, सुनिता मैलवाड, वंदना घुले, बालिका कंधारे, बालिका बरडे, ज्योती गायकवाड, उज्ज्वला सदावर्ते आदी महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. यावेळी श्री कोठारे, द्वारकादास चिखलीकर, प्रशांत देशपांडे, माणिक बेद्रे, विजय धोंडगे, अनिल चोरमले, शिवाजी लष्करे, श्रीमती एस. एम. कलेटवाड, कमल शिंदे, प्रियंका अघाव, स्नेहा पिंपरखेडे, शेरखान पठाण, विठ्ठल कत्ते यांची परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी