क्रांती दिनाचे औचित्य साधुन शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची मानवी साखळी करून हर घर तिरंगाचा संदेश -NNL

गटशिक्षण अधिकारी बालाजी शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम..


हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार।
गटशिक्षणाधिकारीशिक्षण विभाग कार्यालया कडून तालुक्यातील सर्व  शाळांना तात्काळ सूचना देऊन क्रांती दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांची गावातून भव्य प्रभात फेरी काढून जि.प‌.शाळेच्या प्रांगणात मानवी साखळी करत हर घर तिरंगा या मोहिमेला व्यापक रूप देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी श्री.बालाजी शिंदे यांनी सर्व शाळांच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांकडून गावातील मुख्य रस्त्यावर एक भव्य प्रभात फेरी काढून तसेच भव्य मानवी साखळी तयार करून एक वेगळा संदेश नागरिकांना दिला..


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षा निमित्त नांदेड जिल्हा शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशाचे पालन करत हर घर तिरंगा  उपक्रमांतर्गत 9 ऑगस्ट ह्या क्रांती दिनाचे औचित्य साधून भारतीय लोकांच्या मनात राष्ट्रभावना,प्रेम,जागृत करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान  हर घर तिरंगा उपक्रम गावातील प्रत्येकानी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवण्यासाठी व आपल्या लोकांच्या मनात राष्ट्र भावना निर्माण करण्यासाठी  हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकांनी राबवावा असे आव्हान हिमायतनगर येथील  गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद  केंद्रीय प्राथमिक शाळा खडकी बाजार  शाळेतील 270 च्या वर विद्यार्थी व शिक्षक तसेच गावातील सर्व नागरीक ह्या मानवी साखळीमध्ये सहभागी झाले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी