दहा नगरपरिषद व एका नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण सोडत निश्चित -NNL


नांदेड|
जिल्ह्यातील नगरपरिषद देगलूर, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या दहा नगरपरिषद व  हिमायतनगर नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण सोडत निश्तिच करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमानुसार संबंधित नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या अंतिम आरक्षणाची प्रसिध्दी नगरपरिषदेच्या सूचना फलकावर, इतर कार्यालयातील सूचना फलक, तहसिल कार्यालयातील सूचना फलक व नगरपरिषद, नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. तसेच विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक औरंगाबाद यांनी नमूद नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चिती राजपत्रात प्रसिध्द केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी