वेळप्रसंगी समाजकंटकावर कठोर कारवाई करणार - विजय कबाडे -NNL

यावर्षी गणराया अवार्ड देणार 


अर्धापूर, निळकंठ मदने|
पोळा, श्रीगणेशोत्सव,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती दरम्यान शांत वातावरणाला गालबोट लावून कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या समाजकंटकाविरुध्द कडक कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी अर्धापूर येथील शांतता कमेटीच्या बैठकीत अध्यक्षीय भाषणात केले.

अर्धापूर पोलिस ठाण्यात पोळा,श्रीगणेशत्सव,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती,आगामी दुर्गादेवी महोत्सव हे शांततेत करण्यासाठी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले, यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील, तहसीलदार उज्वला पांगरकर, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, मुख्याधिकारी शैलेश फडसे,विजवितरणचे उपविभागीय अधिकारी अविनाश रामगीरवार, मुसव्वीर खतीब,अँड किशोर देशमुख, कृष्णा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संयोजक पो नि अशोक जाधव यांनी सर्व विभागाच्या अधीकाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक  विजय कबाडे म्हणाले कि,अर्धापूर तालुका नेहमी शांतताप्रिय असल्याने प्रशासनाला सहकार्य मिळते. यावेळी श्रीगणेश महोत्सव नियमाप्रमाणे शांततेत पार पाडावा, मिरवणूकीत डिजे वर बंदी आहे.

तालुक्यात कुठल्याही मिरवणूकीत डिजे वाजला तर डिजे चालक व मंडळावर कारवाई होणार व मुद्दामहुन मिरवणूकीत धिंगाणा घालून वातावरणाला जातीयतेचा रंग देणारांवर प्रशासन कडक पाऊले उचलणार असल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थीतांचे म्हणणे एकूण घेतले. यावेळी विजवितरणच्या समस्या उपस्थीतांनी सांगितल्या. तहसीलदार सौ.उज्वला पांगरकर म्हणाल्या की, श्रीगणेश महोत्सव व सर्व सण जनतेंनी आनंदात व शांततेत पार पाडावे, शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे कुणीही उल्लंघन करु नये अशा त्या म्हणाल्या, मुख्याधिकारी शैलेश फडसे म्हणाले कि,शहरात श्री चे विसर्जन करण्याच्या विहीरीचा गाळ काढला असून, नगरपंचायत च्या वतीने शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे सांगितले.

प्रस्ताविकात पोलिस निरीक्षक अशोक जाधव म्हणाले कि, उत्कृष्ट देखावा असलेल्या शहर व ग्रामीण भागात प्रत्येकी ३ एकूण ६ गणपती अवार्ड देण्याचे घोषित केले,गेले वर्षी दुपारी १२ वाजता गणेश विसर्जन करण्याकामी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले, प्रत्येक गावात एक पोळा करावा व नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन केले, याप्रसंगी कानोडे,खतीब, मुळे,कृष्णा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश मदने व आभार पोलिस उपनिरीक्षक बळीराम राठोड यांनी मानले.

यावेळी राजेश्वर शेटे,प्रवीण देशमुख,आर आर देशमुख,गाजी काजी,शेख जाकेर,सोनाजी सरोदे, बाबूराव लंगडे, प्रल्हाद माटे,व्यंकटी राऊत,पंडीतराव लंगडे,संतोष गव्हाणे, संतोष कपाटे, लक्ष्मीकांत मुळे, सखाराम क्षीरसागर, गुणवंत विरकर, नागोराव भांगे,ओमप्रकाश पत्रे, रामराम भालेराव,गोविंद टेकाळे, उध्दव सरोदे,संदीप राऊत,छगन इंगळे, मनोज इंगोले, , रमेश गिरी,उमेश सरोदे, बाबूराव राजेगोरे,अमृत राऊत, सुधाकर कदम, सदाशिव इंगळे, रुपेश देशमुख,डॉ विशाल लंगडे,अमोल डोंगरे,बाळू लोणे, शंकरराव टेकाळे, भगवान पवार, सतिष कदम, दादाराव शिंदे,अशोक डांगे,रंगनाथ इंगोले,रमेश क्षीरसागर, मदनकिशोर डाके,पो.उप निरीक्षक कपील आगलावे, तय्यब अब्बास,डि एम मोळके, साईनाथ सुरवसे, महेंद्र डांगे, कल्याण पांडे, पप्पू चव्हाण,राजेश घुन्नर,धर्मा राठोड, भिमराव राठोड,अर्जुन राठोड, उदयकुमार गुंजकर,संदीप आनेबोईनवाड, संजय घोरपडे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी