उस्माननगर.परिसरात थंडमय वातावरणात मोहरम उत्साहात साजरा -NNL


उस्माननगर, माणिक भिसे| 
मागील अनेक वर्षापासून साजरा करण्यात येत असलेला मोहरम सण  या वर्षी उस्माननगर सह परिसरात  सकाळ पासून झिमझिम पाऊस चालू होता.तीनच्या नंतर विश्रांती मिळाल्याने  दि.९ ऑगस्ट रोजी मंगळवारी  पारंपरिक पद्धतीने शांततेच्या  थंडमय वातावरणात मोहरम उत्साहात साजरा करण्यात आला.मोहरम मिरवणुकीत मुस्लिम बांधवासोबत हिंदू बांधवांचा सहभाग मोठा होता.

पैगंबर हजरत मोहम्मद यांचे नातू हजरत ईमाम हुसेन यांनी मोहरमच्या दहा तारखेला ( दहावी च्या दिनी) जुल्मी अत्याचारी यजीदच्या अन्यायाविरुद्ध लढताना हौतात्म्य पत्करले होते.या दिवसांच्या स्मरणार्थ मोहरम सण साजरा करण्यात येतो.उस्माननगरसह परिसरातील अनेक गावात मोहरम पारंपारिक व आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे.एक मोहरम ते  दहा दिवस  या कालावधीत " शहिदे कर्बला " हजरत ईमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ बसविले जातात.

कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील मोहरमला अनेक वर्षांची परंपरा असून हा उत्सव हिंदू- मुस्लिम बांधव एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपत हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक दाखवून देतात.५ ऑगस्ट रोजी रात्री मौलाली उठून मिरवणूक काढण्यात आली.महील पुरूष भक्तानी दर्शानासाठी गर्दी केली होती.भक्ताकांडून रोट डोक्यावर ठेवून प्रसाद म्हणून वाटल्या जातो.दि.सहा रोजी रात्री काशीमदुल्हा ,दि.७ रोजी बडेनालसाब यांची मिरवणूक काढण्यात आली होती. 

मोहरम म्हटले की, उस्माननगर येथे जातिभेद विसरून मुस्लिम बांधवांच्या अगोदर हिंदू बांधवच पुढाकार घेऊन मोहरम  यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत असतात. गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येकालाच आपापला जीव वाचविण्यासाठी पडले होते.
उस्माननगर परिसरातील अनेक ठिकाणी सवारी बसविल्या जातात.ही परंपरा आजही कायम सुरू आहे.दि.९ रोजी मंगळवारी  या दिवशी विविध ठिकाणी मोहरम निमित्त मिरवणूका काढण्यात आल्या . मंगळवारी सकाळीच " आशुरा " ही विशेष नमाज पाडण्यात आली.

यावेळी मुस्लिम बांधवांनी "शहिदे कर्बला" हजरत हूसेन  यांच्या कार्याची व बलिदानाविषयी माहिती देण्यात आली.ईमाम हुसेन यांची शिकवण मुस्लिम बांधवांनी अंगीकारण त्यांनी सांगितलेल्या विचाराने चालण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात आले. वरूणराजाने  दुपारी विश्रांती  दिल्याने ( मोहरम  ) चव्हाण यांची मिरवणूक काढण्यात आली.गावातील प्रमुख रस्त्यांवर  बडे नालसाब व काशीमधुल्ला यांची भेट झाली.(मोहरम) सावरी  पाहण्यासाठी पुरुष महिला यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी