मुखेड येथे २८ ऑगस्ट रोजी भव्य मातंग परिषदेचे आयोजन -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांच्या लावणीचा कार्यक्रम तर सिनेस्टार गायक साजन बेंद्रे पुणे यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांच्या भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या भव्य मातंग परिषदेला समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वत्तीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील प्रतिभावंत लेखक, वंचितांच्या, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे लोकनायक अशी ख्याती असणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा झुंजार नेता साहित्यरत्न,लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त मुखेड तालुक्यातील मातंग समाज बांधवांच्या वत्तीने शहरात रविवार दि.२८ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मैदान मुखेड येथे सकाळी ११ वाजता भव्य मातंग परिषदेचे आयोजन करण्यात आले. मातंग समाजावरील वाढत चाललेल्या अन्याय अत्याचारा बररोबरच लहुजी साळवे अभ्यास आयोग लागू करण्याचे अनुषंगाने व समाजातील शैक्षणिक, आर्थिक,व इतर प्रश्नावर सविस्तर चर्चा व्हावी व समाजात जन - जागृती करून समाज प्रबोधन करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुक्यातील तमाम मातंग समाज बांधवांच्या वत्तीने  आयोजित पत्रकार परिषदेत संयोजन समितीच्या वत्तीने देण्यात आली आहे.

 कार्यक्रमास नांदेडचे लोकप्रिय खा. प्रताप पा.चिखलीकर,मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.डॉ.तुषारजी राठोड, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे,माजी नगराध्यक्ष प्रा.गंगाधरराव राठोड,प्रमुख वक्ते महाराष्ट्राचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक शंकर भाऊ तडाके,आ.नामदेव ससाणे,मा.आ.नरेंद्र भोंडेगावकर, मा.आ. सुधाकरराव भालेराव, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मारुती वाडेकर,मातंग समाज भुषण तथा संचालक नारायणराव गायकवाड, सामाजिक कार्येकर्ते पंकज गायकवाड, युवा नेतृत्व प्रितम गवाले, किसान सेना जिल्हाध्यक्ष शंकर पा लुट्टे ,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष गंगाधर कावडे,सरपंच शिवाजी बिजले, रणजीत तलवारे, शिवाजी खतगावकर, आत्माराम तलवारे,कल्पना कांबळे, दत्ता गायकवाड, उगवता सूर्यवंशी, परमेश्वर तरटे,मलिकार्जुन वाघमारे, नारायण सोमवारे,पांडुरंग कंधारे, चेअरमन रोहिदास गजलवाड,संजय वाघमारे,प्रल्हाद घायाळे, फिडेल देव, मारोती कुद्रे ,भुजंग गवाले,पांडुरंग सकळे,महिला आघाडीच्या चैत्राताई कांबळे,सुनिताताई गायकवाड, प्रेमलाबाई वाघमारे,सावित्रीबाई कौरटकर,शोभाताई कुद्रे,प्रतिभा देव,ललिताबाई सोमवारे,मथुराबाई गायकवाड,सुगन्यानबाई गायकवाड, सावित्रीबाई तोटरे,अर्चना वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मास सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन तलवारे, विनोद गवाले, मारुती भालेराव,उद्धव गायकवाड, अनिल घायाळे सलगरकर, अनिल कावडे ,भागवत कांबळे,संदेश भालेराव, मारुती कुद्रे, सतीष धनवाडे , स्वप्निल वाडेकर, दादाराव गुमडे,जेजेराव इंगळे,संदीप कबनूरकर,विजय गोरे,मनोहर अंदे, अशोक लोणीकर, भगवान गवाले, सुनील गायकवाड,रामचंद्र गवाले, अमोल वाघमारे,बाबुराव वाघमारे, प्रताप गायकवाड, नवनाथ गायकवाड,सुधाकर सोमवारे, संजय घोरपडे, रामेश्वर घायाळे, संतोष भालेराव, आत्माराम गायकवाड, गौरव घाटे, अविनाश घाटे, साईनाथ गायकवाड, प्रविण मोरे,साईनाथ नवलेकर,नागेश भालेराव, अँड बाबाराव वाघमारे,शेषेराव वाघमारे, के.एम दहिकाबळे , केशव गायकवाड,मारुती घाटे, बालाजी कमळीकर , रत्नदिप गायकवाड, राहुल गजलवाड, गजानन गायकवाड,प्रकाश कांबळे,कपिल गायकवाड, सुभाष भोईवार,लखन देवकांबळे प्रदिप गायकवाड यांच्यासह तालुक्यातील मातंग समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी