मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या कावड यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL


हिंगोली|
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित कावड यात्रेमध्ये भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. भाविकांच्या 'हर हर महादेव'च्या जयघोषाने हा परिसर दुमदुमला.

कयाधू अमृतधारा महादेव मंदिर आयोजित आणि आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून कावड यात्रेचे आयोजन नांदेड नाका येथील अग्रसेन चौकात करण्यात आले. या यात्रा कार्यक्रमास खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, संजय राठोड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने आदी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आमदार बांगर यांच्या पुढाकारातून मागील दहा वर्षांपासून कळमनुरीतील चिंचाळेश्वर महादेव संस्थान येथून कावड यात्रा काढण्यात येते. कळमनुरी येथून काढलेली ही कावड यात्रा हिंगोलीतील कयाधू नदी तिरावरील अमृतेश्वर महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येते. दोन वर्षात कोरोनामुळे यात्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. परंतु यंदा या यात्रेस कावडधारींसह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी