महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्था नांदेडची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न -NNL


नांदेड|
महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित नांदेड ची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२८ ऑगस्ट रोज रविवारी ताज पाटील (हॉटेल) आय.टी.आय.कॉर्नर नांदेड येथे सर्व सभासद बांधव यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. कोविड- १९ मुळे मागील दोन वर्षा पासून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली नव्हती. यावर्षी कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. 

संस्थेचे चेअरमन सुभाष कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आकाश देशमुख जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड, संस्थेचे माजी चेअरमन दिगांबर देगावे, उमाकांत वाखरडकर, एस.के.बोराटे, माजी सचिव रघुनाथ हुंबे, प्रभाकर डांगे, माजी संचालक रमेश मुळे, संग्राम चमकुरे, शंकर फोले, माजी जिल्हा हिवताप अधिकारी आप्पाराव पोले, पप्पू नाईक देसाई, बालाजी चांडोळकर आदी मान्यवर हजर होते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. प्रथम विद्येची देवता श्री सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. 

श्रध्दांजली - संस्थेचे सभासद, ठेविदार, कर्जदार व हितचिंतक तसेच अहवाल वर्षात दिवंगत झालेले सामाजिक शैक्षणिक, राजकिय, सहकार क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींना देशसेवेसाठी अमर झालेल्या विर सैनिक व कोविड-१९ मुळे दिवगंत झालेल्यांना पतसंस्थेच्या वतीने दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली देण्यात आली. सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक,अहवाल वाचन व सुत्रसंचालन पतसंस्थेचे सचिव सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले. संस्थेच्या सभासद यांचे पाल्य इयत्ता दहावी व बारावी मध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु देऊन व सत्कार करून सन्मानित करण्यात आले. तसेच एमबीबीएस व बिएएमएस पुर्ण झालेल्या विद्यार्थी यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव व संचालक म्हणून राहिलेले रघुनाथ हुंबे हे नियत वयोमानानुसार दि.३१ ऑगस्ट रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असल्यामुळे पतसंस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे सभासद व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सतिश शिंदे यांचा आज वाढदिवस आल्यामुळे डॉ आकाश देशमुख जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले. श्री दिगांबर देगावे, उमाकांत वाखरडकर, प्रभाकर डांगे यांनी आमच्या वेळेस ची सर्वसाधारण सभा हि फार वाद विवाद व हमरीतुमरीची असायची तसेच आता हि पतसंस्थेची दिर्घ मुदती कर्ज मर्यादा दहा लाख व आकस्मिक कर्ज पन्नास हजार रुपये केली आहे हि फार आनंदायी बाब आहे तसेच व्याज दर मध्ये एक टक्का कमी केले आहे हे प्रगतीचे प्रतिक आहे असे पतसंस्थे बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

डॉ आकाश देशमुख यांनी पतसंस्थेची आपली एक वास्तू करावी,राष्ट्रीय बँक व  खाजगी बँक मध्ये व्याजदर कमी आहे पतसंस्थेने सुध्दा स्वभांडवली होऊन व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न करावा तसेच सभासद यांनी आपल्या कर्जाची परतफेड नियमित व वेळेवर करावी अशी सुचना केली. पतसंस्थेच्या दरमहा वसुली करीता सहकार्य करणारे जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथील कार्यालयीन अधिक्षक कैलास सावळे, हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड कार्यालयाचे सहाय्यक अधिक्षक कैलास कल्याणकर यांना भेटवस्तु देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अशोक ढवळे, पंच चंद्रभान धोंडगे, संचालक माणिक गिते, मोहन पेंढारे, देविदास भुरेवार, मनोहर खानसोळे, बालाजी आळणे, संजय भोसले, प्रदिप गोधणे, राजकुमार ढवळे, लिपिक कैलास मोरे, सेवक मंगलबाई वानखेडे उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप चेअरमन सुभाष कल्याणकर व आभार प्रदर्शन व्हा.चेअरमन अशोक ढवळे  यांनी केले.

यावेळी पतसंस्थेचे सभासद अशोक शिंदे,साहेबराव कदम, गिरीश पाटील, गणेश ताडेवाड, शशिकांत खुडे, गंगाधर तोटावार, जनार्दन कोटलगावकर, किरण कुलकर्णी, देविदास पेंढारकर, गंगाधर गन्लेवार, राजकुमार इंगळे,शेखर नातेवार, राजु शेट्टे, व्यंकटी बकाल, पुष्पराज राठोड, व्यंकट मोरे, हनमंत वडजे, श्याम सावंत, भारत हाम्पले, शेख ईसा, विठ्ठल सानप, भावेश मुत्तेवार, नामदेव कंधारे, रविंद्र गायकवाड, विनायक करेवाड, माधव कोल्हे, साईबाबा बनसोडे, मोहिब फारूखी, नागनाथ राऊलवार,राजु झाटे, नागोराव धांडे, राजाराम तम्मोड, अरुण खांडरे, विठ्ठल मोरे,अर्जुन सावंत,दिनानाथ बगाटे, शेख नवाज, संभाजी पवार,शंकर कदम, माधव मुंडकर, संतोष माकू, सुरेश पिंपळगावकर, गजानन कंकाळ, स्वप्नील मुस्तापुरे, रविंद्र तेलंगे, देवानंद बोधगिरे, विजय वाखरडकर, आनंद वडवळकर, सुरेश आरगुलवार, उत्तम कराड, बाबुराव सावळे, प्रेमसिंग राठोड, रमेश वाघमारे, गंगाधर गिते, शंकर इसानकर, नागनाथ पवार, संजय कळसे, दत्ता हेलगंड, शेख फेरोज, आन्नाराव धोंड, आत्माराम जाधव, शेख मुख्तार, प्रकाश गायकवाड, पांडुरंग कोरंटलू, शिवाजी यल्लमगुंडे, राजू चव्हाण, संतोष शिरपुरकर, नारायण मेंडके, विष्णू गलपवाड, व्यंकट माचनवाड, विठ्ठल आढाव, सुर्यकांत पांचाळ, हानमंतु कोलगतराम, दत्ता गोरडे आदी सभासद बांधव उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी