नांदेडची विमान सेवा सप्टेंबर अखेर सुरू होईल - डॉ.परविंदरसिंघ पसरीचा -NNL


नांदेड।
गुरुद्वारा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोयी बरोबर नांदेडकरांना अत्यावश्यक असलेली विमान सेवा सप्टेंबर अखेर सुरू होईल यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासकीय अध्यक्ष तथा माजी पोलीस महा संचालक डॉ.सरदार परविंदरसिंघ पसरीचा यांची माहिती येथे दिली. 

तख्त सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी देश विदेशातुन लाखो च्या संख्येने भाविक नांदेड ला येतात. जगप्रसिद्ध हुजूर साहिब गुरुद्वारा मुळे नांदेड चे नाव जगभर पसरले असून नांदेड ला येणाऱ्या यात्रेकरूंना कमी वेळात येता आणि जाते व्यावे यासाठी विमान वाहतूक नियमित असणे आवश्यक आहे, सध्या हि सेवा बंद असल्याने देश विदेशातुन नांदेड येथे येणाऱ्या साठी नांदेड हे गैरसोय होत असल्याने बंद झालेली विमान सेवा पुन्हा सुरळीत चालू होणे आवश्यक आहे, याकरिता गुरुद्वारा बोर्ड आणि विमान कंपनी सोबत बैठक घेण्यात आली आहे असे डॉ पसरीचा यांनी सांगितले.  सप्टेंबर अखेर पर्यंत नांदेड ची विमान सेवा सुरू होईल असा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला नांदेड ते मुंबई अशी विमान सेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई हुन दिल्ली, अमृतसर, चंदीगड साठी विमान उपलब्ध असतील असे त्यांनी सांगितले. 

पंजाब चे वरिष्ठ पत्रकार तथा चीफ पेट्रोन सरदार रूपींदर सिंघ श्यामपुरा, चरर्दीकला टाइम टीव्ही चे संपादक सरदार हरप्रितसिंघ दर्दी, मास्टर जोगेंद्र सिंघ, दलजीत सिंघ कालो,गुरबिदरसिंघ, हरपाल सिंघ मिंटू, मणबीर सिंघ,हरजिनदरसिंघ मुलतानी, नानक साई फाऊंडेशन के प्रमुख पंढरीनाथ बोकारे,सरदार सोडी,सरदार जसबीरसिंघ धाम मुंबईवाले,घुमान साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ गजानन देवकर हे यावेळी उपस्थित होते.

गुरुद्वारा बोर्डाच्या कामकाजात सुसूत्रता आणून गुरुद्वाराच्या माध्यमातून परिसर आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याने  डॉ.पसरीचा म्हणाले. गुरुद्वारा बोर्डा तर्फे चालविला जाणारा लेजर शो लवकरच सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  डॉ.सरदार परविंदरसिंघ पसरीचा हे गुरुतागद्दी सोहळ्याच्या वेळी  गुरुद्वारा चे प्राशासकीय अध्यक्ष होते. त्यांची महाराष्ट्र शासनाने प्रशासक म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी