महाविद्यालयीन संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. तिरुपती मेथे तर सचिव पदी प्राध्यापक माधवराव किन्हाळकर बिनविरोध -NNL


नायगाव।
तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. तिरुपती मेथे तर सचिव पदी प्राध्यापक माधवराव किन्हाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे.

नांदेड नायगाव तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. तिरुपती मेथे तर सचिव पदी प्रा. माधवराव किन्हाळकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली नायगाव येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 27 ऑगस्ट रोजी संघटनेच्या सर्व सभासदांची बैठक घेण्यात आली या बैठकीत नायगाव तालुका अध्यक्षपदी जनता कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. तिरुपती मेथे कापसी कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष प्रा.एसएम कवठेकर ,सचिव प्रा. माधवराव किन्हाळकर, सहसचिव प्रा. एस एस शिंदे, जिल्हा प्रतिनिधी प्रा. जीडी पाटील , जिल्हा संघटक प्रा. जीएस शिंदे, महिला प्रतिनिधी सौ. के यु हटवर, यांची निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाध्यक्ष प्रा. प्रभाकर पवार यांनी काम पाहिले यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी