हिमायतनगर शहरात भाजपच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाला बाईक रैलीने सुरुवात -NNL


हिमायतनगर।
(वाढोणा) येथे हिंदुस्थानाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज हिमायतनगर शहरातून मुख्य रस्त्यावरून भाजपच्या वतीने बाईक रॅली काढून हर घर तिरंगा असा संदेश दिला आहे.


या रैलीचे आयोजन भाजपचे जिल्हाध्यक्ष गोजेगावकर, खासदार  प्रताप पाटील चिखलीकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात करण्यासाठी हिमायतनगर शहरातुन बाईक रॅली काढण्यात आली. श्री परमेश्वर मंदिर बस स्टँड पासून निघालेली रैली पोलीस स्टेशन, सराफा लाईन, किनवट नांदेड रोड पर्यंत काढण्यात आली. यादरम्यान भारत माता की जय,,, वंदे मातरम चा जयघोष करण्यात आले. 


यावेळी भारतीय जनता पार्टीचे ता.अध्यक्ष आशिष सकवान, युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, किशोर रायेवार, ज्ञानेश्र्वर पंदलवाड, कल्याणसिंह ठाकूर, गजनान हारडपकर, सुभाष माने, हिदाईत खान, विनायक ढोणे, राम जाधव, बालाजी ढोणे, संदीप पाटील वानखेडे, सचिन कोमावार, अजय सुंकुलवार, गंगाधर मिरजगावे, शंकर चव्हाण, सुरज चिंतावार, संजय कूरमे, गंगाधर पडोळे, महेशराव अंबिलगे, राम पाकलवार, रुपेश नाईक, सरपंच जीवन जैस्वाल, दत्ता शिराने, ज्ञानेश्वर शेवाळे, अनिल फाळके, विकास भुसावळे विश्वजित वानखेडे संतोष सुर्यवंशी निलेश चटणे, केशव कदम, साहेबराव वानखेडे, मारोती जाधव, विशाल कदम, अनिल माने, दिलीप आरेपल्लु, प्रमोद शिरफुले, अविनाश मोरे, (नंदू). अविनाश कोकुर्ले, राहुल खडके, परमेश्र्वर जाधव, निलेश दरणे, महावीर मांगुळकर, प्रकाश सेवनकर, विनोद चंदनवार, सुधाकर चीट्ठेवार, अंकुश दळवे, अजय जाधव, महेश काळे, प्रशांत ढोले, परमेश्र्वर तोटेवाड, संतोष डांगे, बालाजी जाधव, महेश पोपुवाड, यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी