हदगाव मतदार संघ दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार द्या - आ.माधवराव पाटील जवळगावकर -NNL

हिमायतनगर तालुक्यातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन


हिमायतनगर, अनिल मादसवार|
हदगाव हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हे समजताच मी स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मतदार संघ दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत देण्याची मागणी केली होती त्यानंतर ही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या आणि आता शेतातील पिके हातात लागण्याची शक्यता मावळली आहे त्यामुळे दगाव हिमायतनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी 75 हजार रुपये मदत द्यावी यासाठी उद्या नांदेडमध्ये मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांची भेट घेऊन करणार असल्याचे हादगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले


आज दिनांक सात रोजी हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली याप्रसंगी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर प्रकाश वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष दादा राठोड, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन ताडेवाड, मुख्यध्यापक गजानन सूर्यवंशी, शिप्रा सामाजिक संस्थेचे सचिव दिलीप राठोड, काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान पठाण, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार जवळगावकर यांनी सांगितले की, अतिवृष्टीच्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच तर नुकसान झालेच तसेच तालुक्यातील विदर्भ आणि तेलंगणा सीमेला लागून असलेले अनेक वाशी रस्ता वाहून गेला, तसेच पुलाची कमी उंची असल्यामुळे मंगरूळ येथे शेतकरी वाहून जाताना वाचला, अनेक घरात पाणी शिरले हिमायतनगर शहर व तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे घरपडी झाली, अनेक शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली. यंदाच्या पावसाळ्यात दळणवळण विस्कळीत झाले होते यामुळ सर्व नुकसानग्रस्तांना देखील शासनाने मदत द्यायला हवी. तसेच नादुरुस्त झालेले रस्ते व पुलाच्या कामासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यायला हवा अशी मागणी करणार असल्याचे सांगितले, आंदेगाव, मंगरूळ, नडव्याच्या नाल्याचा पूल यासह अनेक ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे पावसाळा संपतताच हे कामे सुरू होतील असे त्यांनी सांगितले.

तसेच गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचे कृषी कर्जाच्या फायली मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्या शेतकऱ्यांना कर्जासाठी तात्काळ मंजुरी देऊन फायली निकाली काढून शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यात यावे. तसेच मागील आणि यंदा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शासनाने करावी तसेच कृषी कर्जासाठी फाईली मंजुरीसाठी किनवट ऐवजी हदगाव किंवा नांदेड येथे उपविभागीय कार्यालय जोडावे म्हणजे शेतकऱ्यांना कृषी कर्जाच्या येणाऱ्या अडचणी दूर होतीलआणी वेळेवर कर्ज मिळून पेरणीसाठी बी बियाणे उधारीवर्ग घेण्याची वेळ येणार नाही. यासाठी शासनाने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच हिमायतनगर शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबते त्या भागातील जेसीबी द्वारे जाम झालेल्या नाल्या साफ करून पाणी जाण्यास मोकळी वाट करून देण्याचे सूचना मुख्याधिकारी जाधव यांना दूरध्वनीवरून केल्या. तसेच गणेशोत्सव जवळ आल्याने विसर्जन विहिरीची दुरुस्ती तात्काळ करून तात्पुरती कळविण्यात शहरातून वरदविनायक मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवून भाविकांची होणारी अडचण दूर करण्यात यावी. अशाही सूचना त्यांनी दिल्या आगामी सण उत्सवाच्या काळात हिमायतनगर तालुक्यात दारू विक्री आणि चोरी दरोड्याचे प्रकार घडू नये. यासाठी पोलिसांनी गावागावात जाऊन बैठका घेऊन जनतेला जागृत करणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे देऊन सुचविलेल्या सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासने दिले.

अनेक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी अनुपस्थित राहतात त्यामुळे जनतेची कामे खोळंबत आहेत असा प्रश्न विचारतात आमदार महोदय म्हणाले की, तालुक्यात कार्यरत असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांवर वचक ठेवायला हवी. यासाठी स्थानिक अधिकारी यांनी पूर्ण वेळ दिला पाहिजे मुख्यलयी राहील पाहिजे. राहतो म्हणून भाडे घेतात याचा अधिकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेऊ नये नाहीतर अर्धपुरातील पुनरावृत्ती हिमायतनगर येथे होणार नाही याची काळजी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यायला हवी असेही आमदार जवळगावकर म्हणाले. 

पत्रकार परिषदेनंतर आमदार महोदयांनी हिमायतनगर येथील देवस्थान श्री परमेश्वराचे श्रावण मासानिमित्त दर्शन घेतले. तसेच मंदिरात सुरू असलेल्या भागवत सप्ताह प्रवचन करणारे महाराजांना शाल व पुष्पहार अर्पण आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मंदिर कमिटीच्या वतीने आमदार जवळगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठया प्रमाणात नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी