भोकर तालुक्यातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या गावांना उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिसाळ याची भेट -NNL


नांदेड| हागणदारी मुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यात गावस्तरावर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानास अधिक गती देण्यात यत आहे. त्या अनुषंगाने आज भोकर तालुक्यातील गावांना पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी गट विकास अधिकारी अमित राठोड, स्वच्छता तज्ञ विशाल कदम, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार डॉ. नंदलाल लोकडे यांनी यावेळी उपस्थिती होती.   


सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनात भोकर यापूर्वीचे सात व चालू वर्षात 27 असे एकूण 34 गावांचा समावेश आहे. सात गावांची काम प्रगतीपथावर असून 27 गावांचे डीपीआर करण्यात येत आहेत. भोकर तालुक्यातील खरबी, भोसी, कोळगाव व हाडोळी गावांना आज उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिसाळ यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची पाहणी केली. हागणदारी मुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यात गाव स्तरावर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच शाश्वत स्वच्छता, प्लास्टिक संकलन आणि त्याचे व्यवस्थापन आदी विषयावर काम केले जाणार आहे. अशा गावांना ओडीएफ प्लस अर्थात हागणदारीमुक्त अधिक नामांकन देण्यात येणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी