लोह्यात २३ रोजी दहिहंडी; मिस इंडिया उपविजेत्या अभिनेत्री सीमा कदम येणार - NNL


लोहा|
लोहा शहरात २३ ऑगस्ट रोजी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्ण अष्टमी निमित्त खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात सायंकाळी पाच वाजता  होणाऱ्या दही हंडीसाठी मिस इंडिया उपविजेत्या सीमा कदम यांनी विशेष उपस्थिती राहणार आहे असे आयोजक अविनाश पाटील पवार यांनी सांगितले.

युवा कार्यकर्ते अविनाश पाटील पवार यांच्या पुढाकाराने गेल्या आठ वर्षा पासून  दरवर्षी दही हंडीचे  आयोजन केले जाते .जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे मार्गदर्शना खाली युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर सुपर मार्केट समोर दहिहंडी महोत्सव चे आयोजन करण्यात आले. प्रथम येणाऱ्या गोविंदा पथकाला ३१ हजार रुपये  उपनगराध्यक्ष दत्ता वाले यांच्या कडून तर युवा नेते दीपक कानवटे यांच्या वतीने दित्तीय बक्षीस  २१ हजार रुपये तर तृतीय पारितोषिक ११ हजार रुपये कै. आनंद संजय पाटील पवार यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे.

दहिहंडी उत्सवासाठी मिस इंडिया उपविजयेता सीमा कदम यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.  आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अविनाश पाटील पवार मित्रत्व ग्रुप लोहाच्या वतीने केले आहे. दहीहंडी महोत्सवात  सहभागी होण्यासाठी  बंटी देशमाने मो.९९७०९२८५०० व  भास्कर डिकळे मो.९३०९५६६१७५, कृष्णा नागेश्वर मो. ८४०८००६९००, योगी यादव मो.७२१ ८८१९८४२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले  आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी