सिडको परिसरातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विविध ऊपकमांनी स्वातंत्र्य दिन साजरा -NNL


नविन नांदेड।
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सिडको हडको परिसरातील इंदिरा गांधी हायस्कूल, कुसुमताई प्राथमिक, माध्यमिक विद्यालय, शिवाजी विद्यालय, नृसिंह प्राथमिक शाळा, छत्रपती शिवाजी विद्यालय हडको,विधानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा, प्रियदर्शनी प्राथमिक,विवेक वरधिनी प्राथमिक शाळा, नागसेन विघालय यासह परिसरातील विविध शाळा मध्ये सेवानिवृत्त सैनिक, संस्थाचालक पदाधिकारी, मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर परिसरातील विविध भागात प्रभात फेरी व विविध ऊपकमांनी १५ आगसष्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ आगसष्ट हर घर तिरंगा ऊपकम अंतर्गत शाळेसह परिसरातील अनेक भागात विविध ऊपकमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला,१५ आगसष्ट स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सिडको परिसरातील शिवाजी माध्यमिक विद्यालय सिडको व नरसिंह प्राथमिक शाळा येथे संस्थाचालक शिवाजी जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी मुख्याध्यापक व्हि.के हंगरगेकर व प्राथमिक मुख्याध्यापक व्हि.ए. एकुंठवार यांच्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऊपसिथीत होते यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले.व परिसरातील विविध भागात प्रभात फेरी काढण्यात आली.

कुसुमताई माध्यमिक व प्राथमिक शाळा, गोदावरी पब्लिक स्कूल येथे संस्थेचे सचिव संभाजी बिरादार, मुख्याध्यापक कमललाकर जोशी,शशीकला बिरादार, प्राथमिक मुख्याध्यापीका सौ.कारामुंगे, गोदावरी पब्लिक स्कूल गोविंद तोरणे,यु.आर.सावते,शेख निजाम गंवडगावकर,जि.के.देशमुख,एम.डी.माकणे, व्हि.एम. हंबर्डे यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऊपसिथीत होते यावेळी खाऊचे वाटप करून शाळा परिसरातील विविध भागात प्रभात फेरी काढण्यात आली.

इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथे शारदा भवन शिक्षण संस्था कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक एल.एस.माचलोड, पर्यवेक्षक व्हि‌.एल.गोविंदवाड,एम.डबलु .कल्याणकर,सौ.वाय.एस.कोलहैवाड, डॉ.अणणा गरड, प्राथमिक मुख्याध्यापक रमाकांत धसवाडकर, यांच्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऊपसिथीत होते यावेळी खाऊचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

महात्मा गांधी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, वंसतराव नाईक महाविद्यालय जुने सिडको येथे संस्थापक अध्यक्ष डॉ.नानासाहेब जाधव यांच्या ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक जि.एस.शेख,संजय कानवटे यांच्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऊपसिथीत होते यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले व परिसरातील विविध भागात शालेय विद्यार्थी यांनी प्रभात फेरी काढली. हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथे नगरसेविका सौ इंदुबाई शिवाजीराव पाटील घोगरे यांच्ये प्रतिनिधी राजु पाटील घोगरे यांनी ध्वजारोहण केले, यावेळी संस्थेचे सचिव राजेश महागावे, मुख्याध्यापक एस.एस.मोरे, उपमुख्याध्यापक विलास महागावे, माजी नगरसेवक राजू कुलथे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पठाण,ब्रिजलाल उगवे यांच्या ऊपसिथीत शालेय विद्यार्थी यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

हडको येथील विधानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे ध्वजारोहण  सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिक तातेराव संभाजी ढवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी भराडे, नारायण कंदमवार, मुख्याध्यापक विनया बेताळे, लव्हेकर एन.आर.व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऊपसिथीत होते यावेळी खाऊचे वाटप करून शाळा परिसरातील विविध भागात प्रभात फेरी काढण्यात आली.

सिडको संभाजी चौक परिसरातील नागसेन विघालय येथे संस्थेचे अध्यक्ष राहुल मगरे यांनी ध्वजारोहण केले यावेळी मुख्याध्यापक शिवदास गजभारे व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऊपसिथीत होते यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले व परिसरातील विविध भागात प्रभात फेरी काढण्यात आली.  सकाळ पासून पावसाच्यी रिमझिम सुरू असतांनाही अनेक शाळेने प्रभात फेरी काढली,हि पाहण्यासाठी दुतर्फा रस्त्यावरून नागरीकांनी गर्दी केली होती यावेळी भारत माता की जय, वंदेमातरम घोषणा देण्यात आल्या, सहभागी विद्यार्थी महापुरुषांच्या विविध भुमिका साकारल्या होत्या,लेझिम यासह अनेक ऊपकम  प्रभात फेरी साकारण्यात आली होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी