आगीचा भडका उडाल्याने झोपडीसह हॉटेल जळून खाक; कुटुंब उघड्यावर; हिमायतनगर तालुक्यातील महादेव फाट्यावरील घटना - NNL

अग्निशमन बंबाला पाचारण केले; तोपर्यंत संपूर्ण हॉटेल आगीच्या भक्षस्थानी 


हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील प्रसिद्ध महादेव फाट्यावर हॉटेलचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीच्या हॉटेलला आज अचानक आगीचा भडका उडाल्याने आग लागून नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून यातून हॉटेल चालकांसह कुटुंबीय बालंबाल बचावले आहे. हि घटना दि ०३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास महादेवर फाट्यावर घडली आहे. 


हिमायतनगर तालुक्यातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्री पार्श्वनाथ महादेव फाट्यावर ज्ञानेश्वर गंगाराम राऊत यांचं हॉटेल आहे. ते मूळचे सवना येथील रहिवाशी असून हॉटेलचा व्यवसाय चालू केल्यापासन ते कुटुंब महादेव फाटावर राहून उदर निर्वाह करत आहे. नित्याप्रमाणे आज
दि ०३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास हॉटेल चालू करून ग्राहक येतील यासाठी कढईमध्ये तेल टाकून भजे काढण्याच्या तयारीत होता. दरम्यान तेल गरम झाले कि नाही हे पाहण्यासाठी त्याने तेलामध्ये पाण्याचे शिंतोडे शिंपले. यामुळे आगीचा एकदम भडका उडाला अचानक भडका उडाल्याने आगीने पेट घेतल्याने हॉटेलला आग लागली. या आगीत तीन तेलाचे पिपे, खुर्च्या, टेबल, नगदि रक्कम असे मिळून २० ते २५ हजारच नुकसान झाला आहे.

तसेच हॉटेल चालक ज्ञानेश्वर गंगाराम राऊत यांच्या डाव्या हाताला शेक लागल्याने तातडीने येथील चिंचोरडीच्या प्रथम आरोग्य केंद्रात उपचार करून घरी परत आणले आहे. एकूणच दैव बलवत्तर म्हणून सकाळीच त्यांची पत्नी सवना गावाकडे गेली होती. आगीचा भडका उडाल्याने चालकाने देखील प्रसांगावधान राखून बहर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आग लागल्याचे समाजातच हिमायतनगर येथील अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले होते. तातडीने अग्निशमन बंब आल्यामुळे आग विझविण्यात आली असली तरी या आगीत हॉटेल पूर्णतः जाळून खाक झाल्याने हॉटेल चालकाचे कुटूंब उघड्यावर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बी डी भुसनर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कोमल कागणे, नागरगोजे, राचेलवाड आणि चालक कात्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी