जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर कालावधीत सेवा पंधरवडा -NNL

नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे शासनाचे निर्देश


नांदेड|
सामान्य नागरिकांच्या तक्रारी व अर्जावर कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी  17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा प्राधान्याने हाती घेतला आहे. या पंधरवाड्यात नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे निर्देश उप आयुक्त जगदीश मिनीयार यांनी दिले आहेत. 

राज्य शासनाद्वारे 2015 मध्ये आपले सरकार पोर्टल सुरु केले होते. परंतु नागरिकांचे कामे मुदतीत होत नसल्याने सर्व प्रलंबित तक्रारी, अर्जाचे निपटारा करण्यासाठी सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यामध्ये मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील विविध 14 सेवांचा समावेश आहे. सेवा पंधरवड्यात नमूद संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व दि. 10 सप्टेंबर 2022 रोजी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जाचा मोहिम स्वरुपात निपटारा करणे अपेक्षित आहे. 

आपले सरकार वेबपोर्टल-392 सेवा, महावितरण पोर्टल-24 सेवा, डीबीटी पोर्टल-46 सेवा, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय सेवा, विभागाच्या स्वत:च्या योजनाशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज, याव्यतिरिक्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधीचे वितरण, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद देणे, नळ जोडणी देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे,  

मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे (अपिल वगळून), दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा एकूण 14 विभागनिहाय सेवांचा समावेश आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी