हडको बालाजी मंदिर देवस्थानचा 20 व्या ब्रह्मोत्सवाचे आयोजन -NNL


नवीन नांदेड।
हडको बालाजी मंदिर देवस्थान आनंदसागर हौसिंग सोसायटी हडको नवीन नांदेडच्या  20 वा दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान सकाळी व सायंकाळी दैनंदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, ब्रह्मोत्सवा निमित्य सतीश गुरु पोतदार ,विनय गुरु परळीकर , ,इंद्रमनी दुबे  प्रकाश महाराज यांच्या पौरहित्याखाली दि 26सप्टेंबर  ते 5 ऑक्टोंबर दरम्यान सकाळी दि 26 रोजी सकाळी8 वाजता ध्वजारोहण व होम हवन ने सुरुवात व सकाळी अभिषेक आरती बालभोग कलश स्थापना होम हवन ,कुंकुम आर्चन , विष्णुसहस्त्र नाम तर  सकाळी दैनंदिन व सायंकाळी बालाजी लक्ष्मी पद्मावती  दि 3 ऑक्टोंबर रोजी कल्याण उत्सव रोजी दैनंदिन कार्यक्रम व दि 5 ऑक्टोंबर रोजी  दसरा   व सकाळी 8 वाजता देवता विसर्जनपूर्ण आहुती बलिप्रदान व दसऱ्या निमित्य महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

 होम हवन व कल्याण उत्सवाचे मुख्य यजमान संतोष जोशी  हे असून आजीवन अन्नदान देणगी योजना व दहा वर्षीय अभिषेक सेवा नोंदणी चालू असून  अभिषेक नोंदणी म्हणून शुल्क म्हणून ३१०० रुपये  चालु असुन  ब्रम्होतसव  मध्ये  अन्नदान देणगी देणा-या ५० किलो धान्य किंवा ११०० रुपये देणगी  देणा-या यजमानास दोन गंगाळ विनामूल्य देण्यात येणार आहेत. या वर्षी नवीन बांधकाम केलेल्या कल्याण मंडपात होम हवन कल्याण मोहोत्सव होणार आहे

दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त  मंडळाचे अध्यक्ष अरुण दमकोडंवार ,उपाध्यक्ष विवेकानंद देशमुख,सचिव बाबुराव येरगेवार ,कोषाध्यक्ष करणसिंग ठाकूर सहसचिव प्रकाशसिंह परदेशी संस्थापक अध्यक्ष माणिकराव देशमुख , संतोष वर्मा, बाळासाहेब मोरे,अजय भंडारी ,गोवर्धन बियाणी , सचिन नपाते ,संजिवन राजे चंद्रशेखर चव्हाण, सुभाष कारंजकर ,किशोर देशमुख यांनी केले आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी