शेतमजुराच्या मुलाची प्रेरणादायी भरारी: शासकीय वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याला मिळाले 21 लाखाचे पॅकेज -NNL


औरंगाबाद|
आपण करीत असलेल्या प्रयत्नांना जर प्रामाणिकपणाची जोड मिळाली तर निश्चितच ध्येय साध्य होऊन समाजासमोर एक आदर्श ठेवला जाऊ शकतो, व तो आदर्श निश्चित इतरांना प्रेरणादायी ठरू शकतो, अशीच प्रेरणादायी भरारी किरण केंळगंद्रे या विद्यार्थ्यांनी घेतली आहे, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात शेतमजूर असलेल्या आई वडिलांचे स्वप्न उराशी घेऊन समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहात राहून शिक्षण करणाऱ्या किरणला त्यांच्या परिश्रमाच्या जोरावर सॅमसंग सारख्या नामवंत कंपनीत २१ लाख रुपयांचे पॅकेज नोकरीची ऑफर मिळाली आहे.

किरण चे आई वडील दोघेही शेतमजुरी करितात .औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यातील पानवी गावात किरणने त्याचे १२ वी पर्यंतचे  शिक्षण पूर्ण केले. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत  शासकीय वसतिगृह या योजनेत  पुणे येथील 1000 क्षमतेच्या मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहात यादीत नंबर लागला आणि त्याचा प्रवास येथून सुरु झाला.1000 क्षमतेच्या मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह पुणे येथे राहून  (B.TECH.E.N.T.C ) अभियांत्रिकी चे शिक्षण किरण केंळगंद्रे घेत आहे. त्याच्या या यशात वसतिगृहाची त्याला खूप मदत झाली असे तो प्रामाणिकपणे सांगतो, त्याचप्रमाणे वसतिगृहातील सर्व शैक्षणिक सुख-सोयीमुळे माझ्या प्रगतीला चालना मिळाली. या वसतिगृहाच्या आल्यावर मला थोड दडपण होतच .. कि सिनयर असणार आणि ते आपली  रेगिंग घेणार.... पण तसे काहीच झाले नाही ,किंबहुना येथील सिनियरनी मला लहान भावाप्रमाणे सांभाळून घेतलं.तेच वेळोवेळी मला कुठलीही मदत लागली तर तीच माझ्या पाठीशी उभी असायची. असे वसतिगृहातील अनुभव किरण सांगतो.

किरण केंळगंद्रे त्याच्या सिलेकशन दरम्यान बरीच प्रश विचारण्यात आलेली त्यातील एक म्हणजे तू कधी team work केलंयस काय ? त्यावर लगेच त्यांनी न विचार करता उत्तर दिल कि होय ...ते मी राहत असलेल्या वसतीगृतूनच मला करायला आणि शिकायला मिळालय.माझ्या व्यक्तिमत्व विकासाची सुरूवात हि या माझ्या वसतिगृहातूनच झालेली...आज मी जो काही नाव कमवतोय ते फक्त सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या वसतिगृह या योजनेमुळेच.किरणच्या घरातील परिस्थिती अत्यंत बिकट आणि हालाखीची आहे. त्यामुळेच वसतिगृहाच्या माध्यमातून शासनाकडून मिळणाऱ्या सोई सुविधा बद्दल त्याने शासनाच्या विशेष धन्यवाद व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे वस्तीगृहाची गृहपाल श्री.संतोष जैन सर  यांचा त्याचा यशात फार मोठा सिंहाचा वाट आहे. व त्यांचे मार्गदर्शनाखाली मला सतत प्रेरणा मिळाली,.एखादा व्यक्तीत जिद्द,चिकाटी, मदतीची भावना, नवीन शिकण्याची वृत्ती,तसेच  बहुआयामी व्यक्तिमत्व कस असाव आणि ते कस जोपासाव हे  गृह्प्रमुख  संतोष जैन सर यांच्या कडून शिकलो. असे किरण ठामपणे सांगतो.

किरण केळगंद्रे या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल व सॅमसंग या कंपनीमध्ये नियुक्ती मिळालया बद्दल त्याचा समाज कल्याण विभागाच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. मा.श्री.प्रशांत नारनवरे (भा.प्र.से.) आयुक्त समाज कल्याण  महाराष्ट राज्य ,पुणे, यांनी वेळोवेळी विध्यार्थांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊन त्यावर तात्काळ त्या कश्या सोडवायच्या याकडे त्यांचे पूर्ण लक्ष असत.त्यांच्यात अथक प्रयत्नामुळे आज राज्यातील सर्व वसतीगृहातील मुलाना  शैक्षनिक सोयी सुविधा अनुभवायला मिळत आहेत.आज मुलाना अशी भरारी घेण्यात यश मिळतंय ते मा.श्री.प्रशांत नारनवरे यांच्या प्रेरणेमुळेच..   

समाज कल्याण पुणे विभागाचे  मा.प्रादेशिक उपायुक्त श्री बाळासाहेब सोळंकी यांच्या हस्ते किरण याचा सन्मान करण्यात आला. यावेळी समाज कल्याण अधिकारी श्री मल्लिनाथ हरसुरे ,गृहप्रमुख संतोष जैन यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, उपस्थित सर्वांनी किरण याचे अभिनंदन करून   त्यास पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा दिल्यात. शासकीय वसतीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या किरण केंळगंद्रेचे हे यश इतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी