किनवट भागातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 70% मतदान -NNL


किनवट।
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या किनवट तालुक्यातील आज संपन्न झालेल्या 44 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 70% पर्यंत मतदान झाले असावे. असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडल्याचे तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी सांगितले. 


किनवट तालुक्यात आज संपन्न झालेल्या 44 ग्रामपंचायत मधील सरपंच पदाचे 149 उमेदवार रिंगणात होते तर 44 ग्रामपंचायती मधील 361 ग्रामपंचायत सदस्या साठी 808 उमेदवार रिंगणात होते 44 ग्रामपंचायतीमध्ये एकूण मतदार 75,603 त्यापैकी 36 हजार 632 स्त्रिया तर 38 हजार 900 पुरुष मतदार होते व सहा तृतीयपंथी मतदार या 44 ग्रामपंचायती अंतर्गत होते आज झालेल्या निवडणुकीमध्ये फारसा मतदारांचा उत्साह दिसून येत नव्हता दुपारी दीड वाजेपर्यंत फक्त तालुक्यातील 44 ग्रामपंचायत मध्ये 38 टक्के मतदान झाले होते या निवडणुकीत 70% पर्यंत मतदान झाले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे.


सहाय्यक जिल्हा अधिकारी कीर्ती कुमार पुजार तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव हे स्वतः सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे व किनवटचे पोलीस निग अभिमन्यू सोळंके व 13 पोलीस अधिकारी 155 पोलीस कर्मचारी 103 गृहरक्षक दलाचे जवान या बंदोबस्त कामी तैनात करण्यात आले होते तरी एकूण सर्व मतदान केंद्रावर 155 केंद्र अध्यक्ष 155 मतदान अधिकारी 465 छत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. 

मत पेट्या वापस आणण्यासाठी तेरा बस गाड्यांची व्यवस्था केली होती रात्री उशिरापर्यंत सर्व मतभेच्या किनवट तहसीलमध्ये जमा होतील दिनांक 19 सकाळी दहा वाजता मतमोजणी ला आरंभ होईल अशी तहसीलदार यांनी सांगितले आज 44 ग्रामपंचायतीमधील 149 सरपंच उमेदवारांचे भवितव्य पेटीत सील बंद झाले आहे दर 361 ग्राम सदस्यांचे भवितव्य पेटीत शील बंद असून अनेकांना उद्याच्या निकालाची उत्सुकता लागली आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी