हिंगोली लोकसभा मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकयांना ४२८ कोटीची नुकसान भरपाई मंजूर -NNL

खा.हेमंत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश, लवकरच निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार


हिमायतनगर| हिंगोली लोकसभा क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात जुलै ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी होऊन नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे मतदार संघातील हजारो हेक्टर वरील शेती पिके पाण्यात वाहुन गेली होती. यात शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे दगावली होती. शिवाय अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरुन शेतकऱ्यांसह सामान्य जनतेचे प्रचंड नुकसान झाले होते.

हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी पत्रव्यवहार करत सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यामुळेच हिंगोली लोकसभा मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४२८ कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. 

हिंगोली लोकसभा व जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या पावसामुळे पुर येऊन नदीपात्रा लगत असलेल्या हजारो हेक्टर जमिनिवरील पिके पाण्यात वाहुन गेली होती. हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित कृषी अधिकारी यांना शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी अशी मागणी लावुन धरली होती. प्रत्यक्ष भेटी देखिल घेतल्या होत्या.


इतकेच नव्हे तर, राज्यात शिंदे भाजपचे सरकार असून केंद्रातील सरकार देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई व मदत मिळवून देण्याचे आश्वासन खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देवुन धिर देण्याचे काम केले होते. 

जिल्ह्यातील हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकरी बांधवाना धीर देण्यासाठी तात्काळ मदत जाहिर केली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव,  हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत औंढा नागनाथ, सेनगाव,  आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव या तालुक्यांचा समावेश आहे. 

राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्य नेतृत्वाखाली सरकारने शेतकऱ्यांन न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर केलेला निधी लवकरच जिल्ह स्तरावर उपलब्ध होईल त्यानंतर तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल, यासाठीची प्रक्रियाही गतीने सुरू असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी माहिती देतान सांगितले. 

यात हदगाव तालुक्यासाठी ८५ कोटी २० लाख, हिमायतनगर तालुक्यासाठी ४२ कोटी ७४ लाख, हिंगोली ११ कोटी ९ लक्ष, कळमनुरी ४९ कोटी ५ लक्ष, सेनगाव ३२ कोटी २३ लक्ष वसमत ५६ कोटी ७ लक्ष, औंढा तालुक्यासाठी ७ कोटी १४ लाख, किनवट तालुक्यासाठी ६७ कोटी ९ लाख, माहूर तालुक्यासाठी २२ कोटी २० लाख, उमरखेड तालुक्यासाठी ४४ कोटी, महागाव तालुक्यासाठी ३३ कोटी रुपये नुकसान भरपाई प्राप्त झाली असुन हदगाव तालुक्यास सर्वाधिक मावेजा मंजुर झाला आहे. यामुळे शेतकऱ्यां कडुन खासदार हेमंत पाटिल यांचे आभार मानले जात आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी