निर्मिती राम शेट्टी यांच्या 'राडा' या सिनेमात उस्माननगरचा बबलू कळसे; येत्या २३ सप्टेंबरला होणार सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित -NNL

'राडा' या ऍक्शनपटाचा साऊथ स्टाईल टच पाहायला प्रेक्षक सज्ज


उस्माननगर|
राम शेट्टी निर्मित राडा या चित्रपटात उस्मान नगर तालुका कंधार या खेड्या गावातील सामान्य कुटुंबातील बबलू कळसे हा एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.येत्या २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश नरवाडे यांनी केले आहे या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता आकाश रेड्डी यांच्यासोबत अन्य कलावंत असून नांदेडच्या मातीत तयार झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टिझरला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट नक्कीच धुमाकूळ करेल अशी खात्री आहे. खेड्या गावातील बबलू कळसे हा छोट्याशा कुटुंबातील असून त्यांच्या अंगी असलेली कला तो राडा या चित्रपटात दाखविणार आहे.


साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'राडा' सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत राडा घातला आहे. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर, आणि चित्रपटातील दमदार गाणी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी 'राडा' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे.

राम शेट्टी निर्मित 'राडा' या सिनेमाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार "राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प पड़गीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड, योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, बबलू कळसे उस्माननगर , शिल्पा ठाकरे या कलाकारांना पाहणे रंजक ठरणार आहे. 

याशिवाय चित्रपटात आपले सर्वांचे लाडके विनोदवीर लच्छु देशमुख यांच्या अभिनयाची जादू ही पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. राम शेट्टी निर्मित 'राडा' या सिनेमातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना विशेष ठेका धरायला लावले आहे. चित्रपटाची जशी सर्वत्र चर्चा सुरू आहे त्याहून अधिक चर्चा पाहायला विसरू नका.

चित्रपटातील गाण्यांची सुरू आहे. तर चित्रपटात आपले सर्वांचे लाडके मास्टरजी गणेश आचार्य आणि अभिनेत्री, नृत्यांगना हिना पांचाळ यांनी तर धमाकेदार नृत्याचा आविष्कार गाण्यांत दाखविला आहे. चित्रपटातील गाणी आदर्श शिंदे, स्वप्निल बांदोडकर, जसराज जोशी, बेला शेंडे, उर्मिला धनगर, मधुर शिंदे यांनी सुरबद्ध केली आहेत. चित्रपटातील गाणी जाफर सागर लिखित असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना आणि मयुरेश केळकर यांनी सांभाळली आहे. 

गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर हा भव्य ऍक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता ट्रेलर, टिझर आणि गाणी पाहून ताणली गेली असेल यांत शंकाच नाही. त्यामुळे येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात ' जवळच्या चित्रपट  कारागृहात  पहायला विसरू नका.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी