सिरंजणीच्या तरुणांची जागरूकता; चोरीच्या उद्देशाने आलेल्या भामट्यास पकडून केलं पोलिसांच्या स्वाधीन

गावात गस्त घालणाऱ्या युवकांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक 


हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील १० दिवसापूर्वी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजणी येथील प्रसिद्ध देवस्थान हनुमान मंदिर येथील दानपेटी फोडून लाखोंचे दागिन्यांसह नगदी रक्कम चोरी करून चोरटयांनी गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या. याची चर्चा राज्यभर झाली. त्यामुळे गावातील जागरूक युवकांनी चोरट्यान अद्दल घडविण्याचा चंग बांधला असून,गावात गस्त सुरु केली आहे. अशीच गस्त करताना काल रात्री 11 वाजता गावच्या बाजूस चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका भामट्याना येथील युवकांनी मोठ्या दक्षतेने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मागील १० दिवसापूर्वी हिमायतनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिरंजनी गावात चोरांनी धुमाकूळ घातला. आत्तापर्यंतच्या काळात या गावात कधीही चोरी झाली नाही. मात्र पहिल्यांदा सण -उत्सव व धार्मिक कार्यक्रमी झाल्यानंतर ग्रामस्थ गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत असताना दि.२८ च्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यानी येथील मारोतीरायाच्या मंदिरातील मुख्य गेटमधून आत प्रवेश केला. दानपेटी फोडून संपन्न झालेल्या सप्ताह व पोळ्याच्या काळात भाविकांनी टाकलेल्या गुप्तदानाची पेटी फोडून तब्बल अर्धा किलो चांदी व सोन्याचे दागिने आणि नगदी रक्कम लंपास केली आहे. हा सर्व प्रकार मंदिर प्रश्नाने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, चोरट्यानी तोंडाला पांढरा रुमाल बांधला असल्याने त्यांचे चेहरे झाकले गेले होते. 

त्यामुळे या चोरांना धडा शिकविण्यासाठी सिरंजनी येथील तरुणांनी गावात गस्त घातली. भयावह भीतीच्या वातावरणात गावातील महिला, लहान मुले वावरताना काल रात्री 11 वाजता गावच्या बाजूस चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका भामट्याना येथील युवकांनी मोठ्या दक्षतेने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ज्या मंदिरात चोरी झाली तेथून जवळच असलेल्या ओढ्यावर हे चोरटे दबा धरून बसलेले होते. या प्रकारामुळे गावातील नागरिकांनी सुटकेचा श्‍वास घेतला असला तरी यापुढेही गस्त सुरु राहणार आहे. गावात गस्त घालणाऱ्या युवकांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांच्या ताबयात दिलेल्या चोरटय़ांवर काय कार्यवाही होईल ? याची गावकरी वाट पहात आहेत. यापुढे गावात असा प्रकार होणार नाही...कारण येथील जागृत तरुण आता चोरांना सळो की पळो करणार आहेत रात्रीला घडलेल्या या कृतीतून दिसून येते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी