मसतखोर वानराने महिलेला विहिरीत दिले ढकलून,महिला जखमी; नागरिकांच्या सतर्कतेने वाचले प्राण -NNL


किनवट/नांदेड|
नांदेड जिल्ह्यातही वानरांनी उच्छाद मांडला असून, एका मसतखोर वानरांमुळे किनवट तालुक्यातील एका महिलेवर जीवघेणा प्रसंग ओढावला होता. विहिरीत पाणी भरत असताना किनवट तालुक्यातील नांदगावमध्ये एका महिलेला वानराने विहिरीत ढकलून दिलं. विहिरीत पडलेल्या या महिलेचा जीव आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, किनवट तालुक्यातील नांदगावमध्ये एक महिला नित्याप्रमाणे विहिरीवरून पाणी शेंडात होती. यावेळी मसतखोर वानराने महिलेला विहिरीत ढकलून दिले आहे. विहिरीत महिेला पडली असल्याचे लक्षात येताच बजावला सलेल्या लोकांनी प्रसंगावधान राखून सदरील महिलेला विहिरीतून बाहेर काढलं. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. घाबरून गेलेल्या त्या महिलेला लोकांनी लगेचच दवाखान्यात नेलं. तिथे या महिलेवर उपचार करण्यात आले. या महिलेला किरकोळ दुखापत झाल्यानं वानराचा धक्का अगदी थोडक्यात निभावला, अशी भावना गावातील लोकांनी व्यक्त केली. दरम्यान, या घटनेला गावातील नागरिकांकडून वनविभागाला जबाबदार धरलं जात आहे.

तालुक्यातील जन्गलातील वानरांचे टोळके गाव शिवारात येत आहेत, त्यांच्या बंदोबस्ताकडे वन विभागाने केलेलं दुर्लक्ष आणि हलगर्जीपणामुळे लोकांचा जीव धोक्यात येतो आहे. असा आरोप किनवट तालुक्यातील जनतेकडून केला जातो आहे. इस्लापूर वन विभागाला अनेक वेळा माकडांचा आणि वानराचा बंदोबस्त करा, असे ग्रामपंचायतच्या वतीने सांगण्यात आलं होत. मात्र वन विभाग याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असून इस्लापूर येथे माकडांचा प्रताप पाहायला मिळाला आहे.

आतापर्यंत नंदगाव येथील वानराने अनेकांना जोराचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. तर काल नंदगाव येथील पदवी पंडीत ताबारे ही महिला विहिरीवर पाणी भरत असतानाच वानराने या महिलेला विहिरीत ढकलून दिल्यानंतर एखच खळबळ उडाली होती. सुदैवाने शेजारील नागरिक धावले म्हणून ही महिला बालंबाल बचावलीय अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. यासाठी वन विभागाने तात्काळ या वानरांचा बंदोबस्त करावा अन्यथा इस्लापूर येथील वन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी