कापसी ( बु.) येथील युवका विरूद्ध विनापरवाना तलवार बाळगल्या प्रकरणी अटक -NNL


उस्माननगर, माणिक भिसे|
कापसी ( बु.) ता.लोहा येथील एका १९ वर्षीय तरुणाजवळ एक लोखंडी तलवार विनापरवाना बाळगून गावांमध्ये दहशत निर्माण करताना मिळून आल्याने उस्माननगर पोलिस स्टेशनने अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१२ /९/ २०२२ रोजी दुपारी कापसी बु. हा त्यांच्या ताब्यात एक लोखंडी तलवार विनापरवाना बाळगून गावांमध्ये दहशत निर्माण करताना मिळून आल्याने त्यास पकडून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन उस्माननगर येथे गुरनं १६०/२२ कलम ४/२५ भदवि ॳक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि पांडुरंग भारती यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार तपास करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी