मराठवाडा मुक्ती संग्रामाचा वर्धापन दिन नांदेड जिल्हा परिषदेमध्ये साजरा -NNL


नांदेड।
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा वर्धापन दिन नांदेड जिल्हा परिषदेमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे. व्ही.आर. पाटील, नारायण मिसाळ रेखा काळम-कदम प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर,  जिल्हा कृषी अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, ओमप्रकाश नीला यांच्यासह जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

याप्रसंगी पोतदार इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थी राष्ट्रीय नेते व संत-महात्म्यांचे पोषकात दाखल झाले होते. यावेळी अविनाश भुताळे आणि त्यांच्या संचांनी मराठवाडा गीत सादर केले. मराठवाडा मुक्ती संग्राम एक शौर्यगाथा विषयावरील माहितीचे वाचन  शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व सविता बिरगे यांनी केले.


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. ग्रामीण पर्यटनाला चालना  देण्यासाठी नांदेड ऐतिहासिक-सांस्कृतिक पुस्तकाचे प्रकाशन तसेच पोषणाचे महत्त्व पटवून देणारी पुस्तिका, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना व्हावे  यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमधून सहा लाख विद्यार्थ्यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामाची शौर्यगाथा माहितीचे वाचन व प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या मराठवाडा शौय गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. तसेच कृषी विभागामार्फत रानभाज्यांची रेसिपी पुस्तिका आणि शेतकऱ्यांची यशोगाथा या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे  उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक अधिकारी -कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी