महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात शिक्षणाबरोबरच नोकरीची सुद्धा संधी उपलब्ध -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर।
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय हे तालुक्यातील एकमेव शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देऊन स्वावलंबी बनण्यासाठी मेहनत घेत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाद्वारे " करियर कट्टा " या नावाने विभाग सुरू करून नोकरच्या संधी मिळवून देत आहे . नुकत्याच महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स ( एम.एस.एफ.) मध्ये कांबळे निखिल आणि कांबळे लोकडेश्वर या यशवंतांचा सत्कार समारंभ संपन्न झाला .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , व्यासपीठावर उपस्थित उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे हे होते . प्रास्ताविक प्रा.डॉ. शिवसर्जन टाले यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. संतोष शेंबाळे यांनी केले . गुणवंतांना यावेळी शाल , श्रीफळ देऊन गौरविण्यात आले .

कोरोनाच्या संकटातून सावरताना अनेक परिवाराला शिक्षणाबरोबरच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध होताना दिसत आहे . मागील शैक्षणिक वर्षापासून आजपर्यंत एकुण 15 विद्यार्थ्यांची निवड  आय.सी.आय.सी.बँक ,  बंधन बँक व महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स मध्ये करण्यात आली . या विद्यार्थ्यांच्या परिवाराला महाविद्यालय एक मोठा आर्थिक आधार दिला आहे . 

भविष्यात बिर्ला बँक आणि तत्सम अनेक खाजगी क्षेत्रात देखील करियर करण्यासाठी महाविद्यालयाचा " करियर कट्टा " विभाग कार्यरत आहे . स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. शिवसर्जन टाले , प्रा.डॉ. संतोष शेंबाळे यांनी प्रयत्न करीत आहेत . या कार्यक्रमात विद्यार्थी , विद्यार्थिनी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी