एनएमएमएस परीक्षेत मानव्य विकास विद्यालयाचे यश -NNL


देगलूर।
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी घेण्यात येणाऱ्या  एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत येथील मानव्य विकास विद्यालयातील दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. 

शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी व्हावी या उद्देशाने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते.  या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मानव्य विकास विद्यालयाला यश मिळाले असून यावर्षी दोन  विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत . 

शिष्यवृत्ती पात्र धारक विद्यार्थ्यांमध्ये  ओंकार बालाजीराव पारसेवार (खुल्या प्रवर्गात जिल्ह्यात पंधरावा ) व इशांत राजेंद्र सोनकांबळे (अनुसूचित जातींमधून जिल्ह्यात पाचवा ) हे सामील आहेत. यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक संतोष कोल्हे,पर्यवेक्षक शरद हांद्रे ,एनएमएमएस परीक्षा मार्गदर्शक गिरीश पारसेवार ,शिक्षक प्रतिनिधी संजय कल्याणी,श्याम कोल्हे ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी