जुन्या लोहा शहरात डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ आठ दिवसा नंतरही तेथे फवारणी नाही ; नगर पालिका प्रशासन बेफिकीर -NNL


लोहा|
शहरातील जुन्या लोह्यातील कलाल पेठ, साठे गल्ली , तसेच शहराच्या अन्य भागात डेंग्यू तापीचे रुग्ण संख्येत दिसंदिवस वाढ होत आहे  .जुन्या शहरातील ज्या भागात डेंग्यू तापीचे  रुग्ण आढळले तेथे आठ  दिवसा नंतरही नगर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी पोहचले नाहीत मुख्याधिकारी यांनी हतबलता दाखवत फवारणी साठी औषध मागितले असल्याचे सांगतले तीन दिवस झाले पण औषध आले नाही  स्वच्छता विभागाचे इंजिनिअर यांनी दोन दिवसात औषध येईल मग फवारणी करू असे सांगितले. 

लोहा नगर पालिकेत दररोज स्वच्छता साठी जवळपास साठ हजार रुपये खर्च होतो म्हणजे दरमहा जेथे अठरा लक्ष रुपये खर्च केले जातात. तेथे स्वच्छतेचे बेहाल आहेत हे अख्ख शहर जाणून आहे. दररोज सकाळी गल्लो गल्ली रस्ते सफाई केले जात नाहीत .घंटा गाडी येत नाही जेवढे टेंडर मध्ये स्वच्छता कामगार त्यावर देखरेख करणारे तसेच स्वच्छता निरीक्षक नमूद आहेत तेवढे कधीच कामावर लावले जात नाहीत. टेंडर एकाच्या नावावर व चालविणारा दुसरा. त्याच्या कामावर नियंत्रण ठेवणारे भल्या पहाटे आलेत आणि त्याची हजेरी घेतली असे होत नाही आणि कर्मचाऱ्यांनी टेंडर चालविणाऱ्यास काही सांगितले ते तो ऐकत नाही. एवढेच काय तर मुख्याधिकारी यांनी या स्वच्छता टेंडर विरुद्ध मोठी कार्यवाही केल्याचे ऐकवत नाही. म्हणजे नगर पालिका प्रशासन व टेंडर चालविणारा यांची मिलीभगत शहरात अस्वच्छतेला.. तुंबलेल्या नाल्याना..कचऱ्याच्या ढिगाऱ्याला कारणीभूत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया डेंग्यूची लागण झालेले रुग्ण यांचे पालक सदानंद धुतमल, यांनी व्यक्त केली. 


●आठ दिवस झाले....फवारणी झाली नाही●

कलालपेठ , साठे गल्लीत रुग्ण संख्येत वाढ होत आहे. उपचारासाठी काही नांदेड येथे गेले ते उर्वरित रुग्ण लोह्याच्या खाजगी दवाखान्यात  उपचार घेत आहेत. आठ  दिवसा नंतर ही नगर पालिकेने धूर फवारणी केली नाही. फवारा आहे पण औषध नाही असा दुरावस्थेत नगर पालिका आहे. ज्या काळात रुग्ण संख्या वाढू नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे. असा काळात औषधां अभावी फवारणी होत नाही. यावर माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक छत्रपती धुतमल यांनी संबंधिताला चांगलेच खडसावले आहे. दोन दिवसात संपूर्ण शहरात धूर फवारणी करू असे त्यांना सांगण्यात आले. तर पत्रकार रत्नाकर महाबळे, इमाम लदाफ यांनी मुख्याधिकारी यांना धारेवर धरले.

● नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष यांच्यात बेबनाव●

शहराच्या वेगवगेळ्या भागात डेंग्यू तापीचे रुग्ण वाढत आहेत पण नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष -मुख्याधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव दिसला. तातडीने उपाययोजना अध्याप झाल्या नाहीत. नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष एकाच पक्षाचे असले तरी त्याच्यात बेबनाव आहे.. शहरातील दुर्गंधी बाबत उपनगराध्यक्ष यांनी कडक भूमिका न घेता बोटचेपीपण दिसला. त्यांनी तात्काळ धूर फवारणीसाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. पण दोघांतील बेबनाव व विरोधक नसलेल्या पालिकेतील एकाधिकारशाही जनतेला त्रासदायक ठरते आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी